Marathi Kavita Maay Marathi | माझी माय मराठी
Marathi Kavita Maay Marathi : मराठी भाषेविषयी असेलेली तळमळ आणि तिच्या पासून दुरावत चाललेली हि नवी पिढी. यांना पुन्हा एकदा आपल्या भाषेचे महत्व पटवून देणारी आणि आपल्या मातृ भाषेचा अभिमान बाळगा असे कळवळून सांगणारी हि कविता. नक्की वाचा आवडेल तुम्हाला..
माझी माय मराठी | Marathi Kavita Maay Marathi
माझी माय मराठी
मी मराठी, आमची माय मराठी,
आम्ही सगळेच नेहमी म्हणतो,
पण एकमेकांशी बोलत असता,
मराठीला मात्र कमी गणतो ।।
भाषा सर्वच चांगल्या आहेत,
त्यांचा आदर नक्की करावा,
पण इतर भाषांचा आदर करताना,
माझ्या मराठीचा निरादर नसावा ।।
हाय, हॅलो, गुड मॉर्निंग म्हणताना
फार एज्युकेटेड वाटतं,
पण शुभ सकाळ म्हणताच, चेहऱ्यावर
खिजट हसू मात्र दाटतं ।।
पुरे झाला आता इंग्रजीचा रुबाब,
आणि पुरे तिचे अवडंबर,
माझी माय मराठी करण्या श्रेष्ठ
कसा आता तरी कंबर….
कसा आता तरी कंबर…. ।।
अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➦ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स
- Patriotic Poems in Marathi | देशभक्तिपर कविता मराठी-२०२१ - August 14, 2021
- Marathi Poems – Nashib | मराठी कविता नशीब - August 7, 2021
- Marathi Kavita on Ayushya – Mukhavate | मुखवटे - July 14, 2021