Makar Sankranti In Marathi | मकर संक्रांती २०२३
Makar Sankranti In Marathi | Happy Makar Sankranti :
Makar Sankranti in Marathi | मकर संक्रांती २०२3
नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण मकर संक्रांत म्हणजे काय? मकर संक्रांतीला काळे कपडे का घालावे? मकर संक्रांत कशी साजरी करावी? संक्रांतीची पूजा कशी करावी? हे आणि असे बरेच प्रश्न आपल्याला पडलेले असतात. आज आपण या लेखात ते सारे जाणून घेणार आहोत.
Let’s see Makar Sankranti In Marathi.
Table of Contents
मकर संक्रांतीचा सण :
Makar Sankranti san : (Makar Sankranti In Marathi)
१४ जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीचा सण, देशभरात साजरा केला जातो. काही वर्षी हा १५ जानेवारीला साजरा केला जातो. हिंदू संक्रांतीत हा शुभ दिवस आहे. आपल्या हिंदू संस्कृतीत परंपरे नुसार सणांना खूप महत्वे प्राप्त झाले आहेत. त्याचाच भाग म्हणून मकर संक्रांतीला ही हिंदू धर्मात खूप महत्त्व दिलेले आहे. असे बरेच सण आहेत जे धर्माच्या व नियमांच्या आधारानुसार हे सण साजरे करतो. पण त्या पाठीमागे शास्त्रीय कारणही लपलेलं असतं.
मकर संक्रांत म्हणजे काय :
आता जाणून घेऊ मकर संक्रांत म्हणजे काय. तर मकर म्हणजे एका राशीचे नाव आहे आणि संक्रांत म्हणजे संक्रमण किंवा प्रसार. यादिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रेवश करतो. सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रसार होतो, त्यास संक्राती असे म्हणतात. या दिवशी सूर्याचे उत्तरायण होते, म्हणजेच सूर्य उत्तर गोलार्धात येण्यास सुरुवात करतो.
हिंदू पंचांगा नुसार, हा सण पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशीला येतो. शास्त्रा नुसार दक्षिण ही दैत्यांची दिशा म्हणजे राक्षसांची दिशा. आणि उत्तर म्हणजे देवांची दिशा, प्रगतीची दिशा मनाली जाते. सूर्याचे उत्तरायण सुरु झाल्या मुळे भारतात दिवस हळू-हळू मोठे होऊ लागतात व रात्र छोटी होऊ लागते.
दिवस मोठे म्हणजे प्रकाश जास्त काळ आणि अंधकार कमी वेळ. याचाच अर्थ असा घेता येईल,की प्रकाशाची अंधकारवर जीत सुरु होण्याचा दिवस. म्हणूनच या दिवसाला थोडे अधिक महत्व प्राप्त झाले आहे.
या दिवसा पासून थंडीची लाट कमी होऊन हळू-हळू गरमीचे दिवस येऊ लागतात. पंजाब, हरियाणा या ठिकाणी हा सण लोहारी या नावाने साजरा केला जातो. उत्तर प्रदेशात हा दान महिना म्हणून साजरा केला जातो, येथे याला “माघ मेला” असे म्हटले जाते. १४ डिसेंबर ते १४ जानेवारी पर्यंत हा संपूर्ण मास उत्साहात साजरा केला जातो. बिहार मध्य मकर संक्रांति “खीचडी” नावाने साजरा केला जातो. आहे छान माहिती Makar Sankranti In Marathi.
मकर संक्रांती सण का साजरा करावा:
सूर्याचे उत्तरायण ही प्रक्रिया, मकर संक्रांतीच्या रूपाने भारतातील वेग-वेगळ्या प्रांतांत वेग-वेगळ्या स्वरूपात. वेग-वेगळ्या पद्धतीत साजरी केली जाते. या दिवसापासून चांगल्या दिवसाची सुरुवात होते. सूर्य दक्षिण ध्रुवाकडून उत्तर ध्रुवाकडे येण्यास सुरुवात करतो. या दिवसा पासून देवतांच्या उत्सवांची सुरुवात होते.
असे म्हटले जाते की या दिवशी स्वर्गाचे दरवाजे उघडले जातात. म्हणूनच यादिवशी केलेले दान हे इतर सामान्य दिवशी केलेल्या दानापेक्षा जास्त फलदायी असते. असेही म्हटले जाते की या दिवशी शुद्ध तूप आणि शाल यांचे दान अवश्य करावे.
अजून महत्वाची गोष्ट म्हणजे, महाभारतातील पितामह भीष्म, यांनी स्वतःच्या देहाचे त्याग याच दिवशी केले आहे. त्यांना इच्छा मरणाचा वरदान होतं . अशी आख्यायिका आहे की या दिवशी देह त्याग झाल्यास त्यांना पुन्हा ह्या देह धारण करून मृत्यूलोकात यावे लागत नाही, म्हणजेच त्यांच्या आत्म्यास मुक्ती मिळते. (Makar Sankranti In Marathi)
मकर संक्रांती सण का साजरा करावा :
देवी पुरणा नुसार शनि महाराज यांचे त्यांच्या वडिलांशी वैर होते. सूर्य देवाने शनिदेव व त्याची आई छाया यांना वेगळे केले होते. दोघांत पुन्हा प्रेमभाव यावा म्हणून यम राजाने सूर्य देवास शनिदेवास वरदान देण्यास सांगितले. भगवान सूर्याने शनिदेवाला वरदान दिले आहे की वर्षातून एकदा तो मकर राशीत शनिदेवाच्या राशीत येईल.
त्या वेळेस शनिदेवाचे घर समृद्ध करेल, धन-धान्यांची ओत-पॉट असेल. मकर राशीत सूर्य आल्यावर शनिदेवाने सूर्यदेवाची तीळ आणि गुळाने पूजा केली.
म्हणून या दिवशी जो कोणी सूर्य देवाची पूजा करील, त्याला शनि देवाचाही प्रसन्नता होईल. या सर्वांसाठी आपण सारेजण मकर संक्रांत हा सण साजरा करतो.
जसे आपण मगाशी म्हंटल्या प्रमाणे, सूर्याचे या दिवसापासून उत्तरायण सुरु होते. त्यामुळे आपल्या प्रकृतीत बदल होतात. या दिवसापासून थंडीचा प्रादुर्भाव कमी होऊ लागतो. तसेच आपला भारत देशहा शेती प्रधान देश आहे. या दिवसात शेतकरी खरीब हंगामाचे पीक जसे मका, ऊस, शेंगदाणे, उडीत अशे पीक त्याच्या घरात आलेले असते.
कामापासून उसंत मिळालेली असते. घरात आनंदाचे वातावरण असते. म्हणून या सणाला काही ठिकाणी शेतीच्या पिकांचा किंवा शेतकऱ्याचा सण म्हणून साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी या हंगामातील पिकांपासून बनविलेले पदार्थ बनवून त्याचे मोठ्या आनंदात स्वागत करतो. आज कारण समजलं असेल मकर संक्रांत का साजरी करतात ते, Makar Sankranti In Marathi.
मकर संक्रांती सण कसा साजरा करायचा :
मकर संक्रांती च्या दिवशी सकाळी लवकर उठावे. घर स्वच्छ यावरून घ्यावे. घरा समोर रांगोळी काढावी. स्वच्छ अंघोळ करून घ्यावी. नवीन कपडे परिधान करून देवाची पूजा करावी. महाराष्ट्रात सुगड घेऊन त्यात वाण ठेऊन पूजा करतात. सुगड म्हणजे मातीची छोटी मडकी.
सुगडाला ओल्या कपड्याने पुसून घ्यावे, त्यावर हळदी-कुंकूंच्या उभ्या रेषांनी ते सुशोभित करावे. त्यात उसाचे तुकडे, हरभरा, गाजर, शेंगदाणे, गहू, तिळाचे लाडू किंवा तिळाची चिकी. गुळ ठेवतात. ही पूजा करताना., एक स्वच्छ पाट घ्यावयाचे आहे.
पाटाभोवती छानशी रांगोळी काढावी. पाटावर लाल रंगाचा कपडा ठेवावा. पाटावर तांदूळ किंवा गहू ठेवून त्यावर सुगड ठेवायची आहे, सुगडाला फुलं, हळदी-कुंकूं, धूप-दीप, अक्षदा, अगरबत्ती ओवाळून मनोभावे पूजा करावी. भक्ती-भावाने नमस्कार करावा. सर्वकाही मंगलमय व्हावे अशी सूर्य देवास प्रार्थना करावी. त्यानंतर तिळाचे लाडू-हलवा असा गोड-धोडाचा प्रसाद दाखवावा.
काही ठिकाणी ही सुगड सुवासिनी स्त्रियांना ही भेट म्हणून देण्याचीही प्रथा आहे. तर काही ठिकाणी कुमारिकांनाही भेट देण्याची प्रथा आहे. वेग-वेगळ्या ठिकाणी परंपरे नुसार थोडा फार फरक असू शकतो. पण उत्साह तोच असतो, भाव तोच असतो आणि आनंदही तसाच असतो.
मकर संक्रांतीच्या तिसऱ्या दिवशी पासून स्त्रिया हळदी-कुंकू चे कार्यक्रम सुरु करतात. आपापल्या नातेवाईक, शेजारी-पाजारी जाऊन तीळ-गूळ वाटले जाते. हे करताना तीळ गूळ घ्या, गोड बोला, असे म्हणतात.
तर अश्या प्रकारे आपण मकर संक्रांत हा सण साजरा करतो. काही नवीन माहिती मिळाली येथे Makar Sankranti In Marathi.
मकर संक्रांतीला काळे कपडे का घालावे?
पुराण शास्त्राच्या मान्यते नुसार, मकर राशी ही शनिदेवाची राशी आहे, आणि शनिदेवाच्या कपड्याचा रंग काळा असतो.
विज्ञान शास्त्रा नुसार काळा रंग गरमी शोषून घेतो, म्हणून या थंडीच्या ऋतूत आपल्या शरीराला गरमी मिळण्यासाठी याची मदत होते.
मकर संक्रांती मागील वैज्ञानिक शास्त्र :
Makar Sankranti In Marathi
या दिवशी तीळ-गूळ खाण्याची प्रथा आहे. तीळ खाल्याने शरीरात गरमी तयार होण्यासाठी मदत होते. तसेच या ऋतूत मका, गाजर, हरभरे, ऊस अशी अनेक पिकेही येतात. ही पिके किंवा फळे खाणेही आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. आपण स्वतःहून हे खात नाही, पण आपला सण म्हटला, देवाची पूजा समजली तर त्यासाठी आवर्जून खातो, तीळ-गूळ घरात बनवतो.
अशा प्रकारे अनावधाने, कळत-नकळत वा प्रथा म्हणून का होईना पोषक तत्व शरीराला मिळतात. आपण आपले आरोग्य, बदलणाऱ्या ऋतू नुसार ठीक ठेवण्यासाठी, या सणांच्या माध्यमातून उपयोग कर असतो. आहे ना उपयोगी.
आम्हाला आशा आहे की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. जर आपणास या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील सांगा. कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ! (Makar Sankranti In Marathi)
अधिक माहिती :
१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड
अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
आवश्यक लिंक्स :
शैक्षणिक माहितीसाठी : येथे क्लीक करा.
खेळांविषयी च्या माहितीसाठी : येथे क्लीक करा.
So here is complete information about Makar Sankranti In Marathi. I hope you get more detail information on Makar Sankranti in Marathi. Please share this info with your friends, Makar Sankranti In Marathi.
Khupach chan.. Detail madhe samjal aaj makar Sankranti baddal.
धन्यवाद! आपल्या कमेंट्स मुळे स्फुर्ती मिळते. असेच नवे नवे लेख वाचत रहा.