What Is Insurance – Perfect Info | विमा म्हणजे काय ?

What is insurance in Marathi | विमा म्हणजे काय ? : आज आपणास विम्या विषयीची सर्वसाधारण माहिती असणे आवश्यक आहे. या लेखात हीच माहिती साध्या-सोप्या भाषेत आपण घेणार आहोत.

What is insurance in Marathi | विमा म्हणजे काय ?   विम्याचे प्रकार किती व कोणते, विम्याचे फायदे काय आणि अश्या बऱ्याच प्रश्नांचे उत्तर आपणास यालेखात मिळणार आहेत. खूप खोल तांत्रिक दृष्ट्या न जाता, साध्या-सोप्या भाषेत समजून घेऊ. 

विमा म्हणजे काय ? (What Is Insurance)

विमा म्हणजे एक कायदेशीर करार आहे, जो विमा घेणाऱ्या व विमा देणाऱ्या या दोन घटकांमध्ये सामंजस्याने केला जातो.

या करारा द्वारे विमा घेणारा हे मान्य करून हमी देतो,  की जर भविष्यात एखाद्या अनिश्चित घटनेमुळे माझे नुकसान झाले तर तू मला पूर्ण नुकसान भरपाई द्यायची.  त्यासाठी मी आज ठराविक एक रक्कम तुझ्या कंपनीला देणार. तसेच विमा देणारा हे मान्य करतो की जर भविष्यात एखाद्या अनिश्चित घटनेमुळे तुझे नुकसान झाले तर मी  तुला पूर्ण नुकसान भरपाई देणार, पण जर नुकसान झालेच  नाही तर तू, मला दिलेली रक्कम पूर्ण माझी होणार.

आणि जेंव्हा दोन्ही घटकांना ह्या अटी मान्य असतील तर विम्याचा करार हस्ताक्षरीत होतो व विमापत्र तयार होते. यालाच आपण Insurance  Policy म्हणतो.

एक छोटं उदाहरण घेऊ, म्हणजे विमा ही संकल्पना अधिक चांगली समजून घेता येईल.   एक विमा संस्था आहे आणि १०० विमा घेऊ इच्छुक संस्था आहेत.  या १०० संस्था मधील प्रत्येक संस्थेचा १ करोड चा सामान वाहतुकीत जात असतं. पण अपघात, चोरी, माल खराब होणं अशा  बऱ्याच कारणामुळे प्रत्येक संस्थेचं १ करोडचं नुकसान होऊ शकतं.  म्हणून या संस्था विमा संस्थेकडे  १ करोडचा विमा घेतात, त्यासाठी त्या १.५० लाख (दीड लाख) रक्कम देतात,  म्हणजेच हप्ता (Premium).  असे विमा संस्थेकडे १०० संस्थांचे मिळून १.५ करोड जमा होतात.  जरी कुणाची नुकसान भरपाई आलीच तर, या प्रीमियम मधून गोळा रकमेतून सहज दिली जाते.

आशा प्रकारे दोन्ही संस्थांच काम होतं. दीड लाखात १ करोडच्या मालाची निश्चित मिळते, तर विमा कंपनी शंभरातुन एक नुकसान भरपाई देणे सहज शक्य होतं.  

आशा करतो विमा संकल्पना नीट समजली असेल.

आता विम्याचे प्रकार किती ते समजून घेऊ. (What Is Insurance)

मुख्यतः विम्याचे दोन प्रकार :

१)  जीवन विमा  (Life Insurance)
२)  सामान्य विमा  (General Insurance)

१)  जीवन विमा  (Life Insurance)  :

शब्दातच सर्व काही आहे.  मानवी जीवनाशी संबंधित असणारा आहे. या विम्या मध्ये आपल्या आयुष्याची जोखीम स्वीकारली जाते.  जर विमा धारक म्हणजे विमा घेतलेल्या व्यक्तीस अचानक आलेल्या आपत्तीमुळे जीवित हानी होते, तेंव्हा त्याच्या वारसाला त्याने घेतलेल्या विम्याची पूर्ण रक्कम दिली जाते.  कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने ही विम्याची तरतूद केली जाते.  सध्याच्या या अनिश्चिततेच्या जगात जीवन विमा असणे खूप खूप आवश्यक आहे.

या मधेही अजून वेगळे प्रकार आहेत.

आत्ताच्या काळात, अपघाती विमा व गंभीर आजार यांचाही समावेश जीवन विम्यासोबत जोडला जातो.  (What Is Insurance)

२)  सामान्य विमा  (General Insurance)  :

जीवन विमा सोडून इतर सर्व विमा प्रकार या सामान्य विमा सादर खाली येतात.

जसे,

➥ वाहन विमा (Motor Insurance),
➦ आरोग्य विमा (Health Insurance), 
➥ अपघाती विमा (Accidental Insurance)
➦ संपत्ती विमा (Property Insurance),
प्रवास विमा (Travel  Insurance),
➦ व्यावसायिक विमा (Corporate Insurance),
➥ मोबाइल विमा (Mobile Insurance)

(What Is Insurance)

a) वाहन विमा (Vihicle Insurance) :

आज सर्व जगात वाहन विमा घेणे खूप खूप आवश्यक आहे.  वाढती लोकसंख्या, आणि वाढते वाहनांचे प्रमाण यामुळे, रस्त्यांवरील अपघाताचे प्रमाण खूप पटीने वाढले आहे. या विम्यामुळे अकस्मात येणाऱ्या आपत्ती जसे, अपघात यापासून होणाऱ्या आर्थिक नुकसानाचे संरक्षण होते. वाहनास होणाऱ्या दुरुस्तीचा खर्चाची भरपाई दिली जाते, तसेच समोरच्या (त्रयस्थ) वाहनांचीही (Third-Party) नुकसान भरपाई सामावलेली असते.   तसेच वाहन विमा घेणे हे भारत सरकारच्या नियमानुसार कायद्याने बंधनकारक असल्यामुळे, तो आपल्याला आवर्जून घ्यावाच लागतो. (What Is Insurance)

b) आरोग्य विमा (Health Insurance) :

हा विमा आपण आपल्या आरोग्य उपचारासाठी होणाऱ्या महागड्या  वैदकीय खर्चाची भविष्यातील तरतूद म्हणून खरेदी केला जातो. काही पश्चात देशांत आरोग्य विमा सरकारकडूनच दिला जातो.  या विमा प्रकारात बऱ्याच वेगवेगळ्या पॉलिसिज आहेत. जसे सर्व साधारण वैयक्तिक विमा, कौटुंबिक विमा, वयस्क व्यक्ती विमा. काही विशिष्ट्य रोगांवरही विमा पॉलिसी आपण खरेदी करू शकतो. या विमा पॉलिसीच्या प्रीमियम मध्ये, हॉस्पिटलचा खर्च, डॉक्टर्सची फीस, औषधांचा खर्च, उपचारासाठी कराव्या लागणाऱ्या विविध चाचण्या (Tests) चा खर्च सामावलेला असतो. (What Is Insurance)

c) अपघाती विमा (Accidental Insurance) :

ह्या विमा प्रकारात आपण आपल्या केवळ आणि केवळ अपघाताची जोखीम कव्हर करतो. जर विमा घेतलेल्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला, तर त्या वक्तीच्या वारसास, पूर्ण विमा रक्कम देय केली जाते. तसेच अपघात झाल्यावर विमेदार जखमी झाल्यास त्याचे हॉस्पिटलायझेशन आणि औषधाचा खर्च समाविष्ट असतो.
(What Is Insurance)

d) संपत्ती विमा (Property Insurance) :

आपल्या सर्वांचे स्वप्न असते की, एक स्वतःचे घर असावे, त्यात छान-छन वस्तू असाव्यात.  संपत्ती विमा आपला घर, घरातील वस्तू, दुकान, दुकानातील वस्तू किंवा इतर संपत्तीचा नैसर्गिक आपत्ती पासून होणारे संभाव्य नुकसान सुरक्षित करतो. यामध्ये, संपत्तीस होणारे अपघात, जसे, आग, भूकंप, पूर, अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती पासून होणाऱ्या नुकसान कव्हर होतात.

e) प्रवास विमा (Travel  Insurance) : 

ह्या विमा प्रकारात प्रवासात होणाऱ्या संभाव्य धोक्यापासून होणाऱ्या नुकसानाची भरपाई होते.  या मध्ये व्येक्तीचे जीवन किंवा वाहतूक मालाची जोखीम स्वीकारली जाते. हा विमा फक्त एका प्रवास पुरताच मर्यादित असतो.  (What Is Insurance)

f) व्यावसायिक विमा (Corporate Insurance) :

या विमा प्रकारात व्यावसायिक मालमत्तेची चोरी, आर्थिक नुकसान, कर्मचार्‍यांचे आरोग्य आणि अपघात यासारख्या जोखमीपासून त्यांचे व्यवसाय संरक्षित करण्यासाठी मोठ्या-मोठ्या संस्था अशा प्रकारचे विमा संरक्षण  करतात.

g) मोबाइल विमा (Mobile Insurance)  :

ह्या विमा प्रकारात मोबाईल ला होणाऱ्या  संभाव्य धोक्यापासून होणाऱ्या नुकसानाची भरपाई दिली जाते. या मध्ये

मोबाईल डॅमेज होणे, पाण्यात पडणे, किंवा इतर काही अपघातामुळे मोबाईल ला होणाऱ्या नुकसानाची भरपाई केली जाते. किंवा मोबाईल रिपेअर होणे शक्य नसल्यास मोबाईल रिप्लेस केला जातो. (What Is Insurance)

विम्याचे फायदे काय ?

➣ वरील प्रमाणे वेगवेगळ्या विमा प्रकारात सर्वात पहिला फायदा म्हणजे होणाऱ्या संभाव्य नुकसानाची आर्थिक भरपाई हाच असतो.
➢ काही मोठ्या कंपनी आपल्या कामगारांना आरोग्य व जीवन विमा देऊन त्याची मानसिकता आणि कंपनीविषयी प्रामाणिकता वाढविण्यासाठी विमा खरेदी करतात.
➣ सुरक्षितता व संरक्षितता या फायद्यांव्यतिरिक्त, अजून एक फायदा म्हणजे आयकरात मिळणारी सूट. प्रत्येकाच्या वार्षिक उत्पन्नानुसार विमा प्रीमियम भरल्यामुळे त्यांना आयकरात (Income Tax) सूट दिली जाते.

सारांश :

अश्या प्रकारे आपण या लेखात जीवन विमा, आरोग्य विमा, सामान्य विमा आणि त्यांचे उप प्रकार ही पहिले.  आपण विमा पॉलिसी ऑफलाइन किंवा ऑनलाइन खरेदी करू शकता. बऱ्याच वेळा विमा हा विमा एजंट्स आपल्याला पॉलिसी खरेदी करण्यास मदत करतात, त्याचे मुख्य कारण ही आहे, जसे ते क्लेम प्रोसेस करण्यास मदत करू शकतो. विमा कंपन्यांच्या वेबसाइट्स देखील आहेत ज्यातून आपण online पॉलिसी खरेदी करू शकता. विमा पॉलिसीची निवड आणि गुंतवणूक करण्यापूर्वी आपण आपले संशोधन करावे, खात्री आणि सुनिश्चितता झाल्या नंतरच विमा खरेदी करा.

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स

Marathi rang
संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x