आमच्या विषयी | About us

संतोष शांताराम भरणुके,

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र – मोहा. कॉमर्स मधून पदवीधर झाल्यानंतर, कम्प्युटर अँप्लिकेशन डिप्लोमा केल्या नंतर जवळपास ७ कंपनीमध्ये १६ वर्षांहून अधिक कार्य केले आहे. कम्प्युटरची आफट आवड आणि प्रोग्रॅमिंगचे असेलेले वेड. यामुळे कम्प्युटर क्षेत्रातच स्वतःच वलय निर्माण करावं या एकाच उद्देशाने मी हा ब्लॉग विकसित करायचे ठरवले आहे.

यामध्ये मी कविता, कथा, टेकनॉलॉजि विषयीची माहिती, आमचे अनुभव आणि बरेच काही देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
माझ्या सोबत अजून तीन लेखक आहेत, जे त्यांच्या शैलीत, त्यांच्या आवडीचे विषय तुमच्या समोर आणतील. एकंदरीत वाचकांसाठी काहीतरी वेगळं आणि मजेदार आणण्याचा प्रयत्न असेल. तुमची साथ मिळावी हि एकमेव अपेक्षा. धन्यवाद!

प्रियंका रोठे :

नमस्कार, मी प्रियंका रोठे, महाराष्ट्र, ठाणे. मी मागील ८ वर्षाहून अधिक एका सुप्रसिद्ध एमएनसी कंपनीत एच. आर. म्हणून कार्यरत आहे. असे असले तरी मी यशस्वीरित्या माझ्यातील लेखनाचे प्रेम जपले आहे. मला माझे विचार मातृभाषा, मराठीतुन लेखणीच्या साह्याने स्पष्ट करायला आवडतात. यामुळेच मला आयुष्यातील प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी, अपार सामर्थ्य आणि उर्जा मिळते.

पुस्तकांबद्दल माझे प्रेम बालपणातच विकसित झाले. मी शाळेच्या ग्रंथालयातून पुष्कळ पुस्तके वाचत होते. तेथून मला लेखनाची आवड आणि सवयही लागली, आता तो माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. मला आशा आहे की तुम्हीही याचा आनंद घ्याल. धन्यवाद!

अंकिता जगदीश सोनटक्के :

Ankita Sontakke - marathirang.co,

नमस्कार, मी अंकिता तेलवणे सोनटक्के, महाराष्ट्र, रायगड-मोहोपाडा. कॉमर्स मधून पदवी घेत असतानाच माझं लग्न झालं, त्यामुळे माझ्या आवडींना काही काळासाठी का होईना मला दूर करावे लागले. लग्नाच्या दोन वर्षांनंतर माझ्यातील छंदांनी मला पुन्हा हाक मारली आणि माझी गाडी त्या दिशेने वळली.


माझा सर्वात आवडीचा छंद नृत्य, जो माझ्या ओळखीच्या सर्वांनाच माहित आहे. पण कोणालाही न कळलेला आणि माझ्याच पुरता मर्यादित असलेला माझा दुसरा छंद म्हणजे माझे लेखन. मी मराठी रंग (marathirang.com) या ब्लॉगच्या मार्गाने तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा एक निर्मळ प्रयत्न आहे. मला आशा आहे आपणा सर्वांनाही आवडेल. धन्यवाद !

विशाल शंकर पाटील (सह्याद्रीचा भटकभवान्या)

मी विशाल शंकर पाटील, महाराष्ट्र, पनवेल, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करून सुरुवातीस दीड वर्ष एका कंपनीमध्ये कार्यरत होतो आणि आता स्वतःचा व्यवसाय करत आहे. आठवड्याचे ५ दिवस काम आणि उरलेले २ दिवस निखळ भटकंती हे तत्व जपत भटकंतीचा छंद जोपासत आहे. निसर्गमित्र, पनवेल या संस्थेसोबत गेली ५ वर्ष जोडला गेलेलो आहे. संस्थेसोबत किंवा वैयक्तिक जशी जमेल तशी जास्तीत जास्त वेगवेगळ्या किल्ल्याना भेट देत असतो.

किल्ले भेट याविषयीच मी या ब्लॉग मध्ये माझ्या स्वतःच्या शैलीत लेखन करणार आहे, मी केलेल्या ट्रेक्सचे जिवंत वर्णन करण्याचा प्रयत्न आहे. अशा करतो तुम्हाला तो नक्की आवडेल. स्वतःला सह्याद्रीचा भटकभवान्या म्हणवून घ्यायला मला खूप आवडेल.

error: Content is protected !!