Marathi Bhasha Poem | मराठी – माझ्या आत्माचे स्वप्न
Marathi language, Mother tongue poem, Emotional Marathi poetry, Marathi culture and heritage, Importance of mother language.
श्लोकातील मातृभाषेसाठी स्तुती

Marathi Bhasha Poem | मराठी – माझ्या आत्माचे स्वप्न
“मराठी – माझ्या आत्माचे स्वप्न”
हे मराठी, माझ्यासाठी तू नदीचे गाणे
आवडते मला तुझे हृदयातून वाहणे.
तुझे शब्द जणू वसंतातील फुलांचा बहर,
त्यांनी आणलेल्या सुगंधी आठवांचा कहर.
संस्कृतीचा पाळणा तू, मंदिर अभिमानाचे,
तुझ्या मिठीत राहावे हे स्वप्न या आत्माचे.
तुझे शब्द जणू पावसात नाचणारे मोर,
आनंदाचे संगीत तू, वेदनांवर शीरजोर.
वारकऱ्यांच्या संत गीतांतून तू कुजबुजते,
ज्वलंत श्लोकांनी तू स्वातंत्र्यास पूर्ण भरते
हसू आणि अश्रूंनी विणलेली तू सागरवेणी,
हजारो वर्षांचा गर्जनांची जशी तू प्रतिध्वनी.
शांत करणारी राग तू, उभारी देणारी उब तू,
सह्याद्रीच्या डोंगरदरीत वाऱ्यासंग घुमतेस तू.
शूर योध्यांचे शौर्य अन जुन्या पुराण्या दंतकथा,
तुझे प्रत्येक “अक्षर” उलगडते रहस्यमयी कथा.
भले असो दूर मी, तू माझा दीपगृह चमकणारा,
भरकटलेल्या मनासाठी तूच मार्गदर्शक तारा.
प्रत्येक भरल्या श्वासाने घेईन तुझी काळजी मी,
तू माझ्या शांततेत रहा, जेंव्हा भेटेन मृत्यूला मी.
एक शाश्वत बंधन, शोधण्याच्या पलीकडचा,
आरसा तू माझ्या, आत्म्याच्या प्रतिबिंबाचा.
हे माय मराठी, माझी आई तूच माझे संगीत,
सदैव गुंजत राहील, माझ्या हृदयात तुझे गीत.
. ➥ संतोष भरणुके
Marathi Bhasha Poem, Bharat Bhumi Mazi | भारत भूमी माझी | Patriotic Poem
Marathi Prem Kavita-3 | Love Poem In Marathi | मराठी प्रेम कविता
इतर माहिती :
For Credit Card Apply here:
अधिक आकर्षक लेखांसाठी आमचे अनुसरण करा आणि जग एक्सप्लोर करण्यासाठी कनेक्ट रहा मराठी रंग सोबत. चला संवाद आणि समजूतदार पणाची शक्ती स्वीकारूया.
अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स.
➥ Learn What is credit card – Infolips.
- Pahili Zalak Marathi Poem : Best Marathi Love Poem #1 - May 20, 2025
- Yad Lagala Ga Lyrics in Marathi – Sairat – याड लागलं ग | Best Lyrics #1 - May 13, 2025
- Bhabad Sapan Lyrics – Paru Marathi Serial | भाबडं सपान पाहू दे ! - April 12, 2025