Marathi Kavita Marathiche Rang | मराठीचे रंग : या कवितेत मराठी भाषा आणि तिचे वैशिष्ट्य काय आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी भाषा अजून वृद्धिंगत व्हावी तिचा अजून विस्तार व्हावा यासाठी भाषेची माहिती लोकांना माहित व्हावी हाच विचार ठेऊन ही कविता लिहिली आहे. मराठी लिखाणाचे वेगवेगळे अंग, वेगवेगळे प्रकार यांचे वर्णन केले आहे. आशा करतो तुम्हालाही आवडेल. धन्यवाद !

Marathi Kavita Marathiche Rang | मराठीचे रंग
चला खेळूया मराठीच्या संग, चला होऊया मराठीत दंग,
चला पाहूया मराठीचे अंग, चला उधळूया मराठीचे रंग ।। धृ ।।
हा रंग श्लोकाचा, समर्थांच्या कीर्तीचा,
हा रंग ओवीचा, ज्ञानोबाच्या ज्ञानाचा,
हा रंग अभंगाचा, तुकोबाच्या भक्तीचा,
हा रंग भजनाचा, नामदेवाच्या श्रद्धेचा,
चला होऊया भजनात दंग, चला होऊया मराठीचा अभंग,
चला पाहूया मराठीचे अंग, चला उधळूया मराठीचे रंग ।। १ ।।
हा रंग वेदांचा, हा रंग अध्यायाचा,
हा रंग पोथीचा, हा रंग पुराणाचा,
हा रंग ग्रंथांचा, हा रंग कीर्तनाचा
हा रंग काव्याचा, हा रंग पद्याचा
चला होऊया काव्यात दंग, चला पाहूया या पद्याचे ढंग,
चला पाहूया मराठीचे अंग, चला उधळूया मराठीचे रंग ।। २ ।।
हा रंग पोवाड्याचा, जणू रंग शौर्याचा,
हा रंग लावणीचा, जसा रंग शृंगाराचा,
हा रंग मानवतेचा, हा रंग अभिमानाचा
हा रंग अस्मितेचा, हा रंग कवितेचा
चला पाहूया कवितेचे ढंग, चला होऊया पोवाड्यात दंग ,
चला पाहूया मराठीचे अंग, चला उधळूया मराठीचे रंग ।। ३ ।।
अधिक माहिती :
१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स
- Mazi Marathi Tu Marathi Poem : माझी मराठी तू - February 27, 2026
- पेन आणि पेन्सिल | Pen Ani Pencil Marathi Poem | Bal Kavita in Marathi - August 14, 2025
- Shree Hanuman Chalisa – Full and Best | श्री हनुमान चालीसा - June 28, 2025
Marathi Rang माहितीचे नवे रंग