Marathi Kavita on Ayushya – Mukhavate | मुखवटे

Marathi Kavita on ayushya – Mukhavate | मुखवटे : आजकाल आपल्या आयुष्यात प्रत्येकजण स्वतःचा स्वार्थ साधून घेत असतो. तो स्वार्थ साधून घेण्यासाठी प्रत्येकजण स्वतःला चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी प्रत्येकजण आपल्या चेहऱ्यावर एक खोटा मुखवटा ठेवत असतो. या कवितेत अशा चेहऱ्याचे वर्णन केले आहे. आशा करतो तुम्हालाही आवडेल. धन्यवाद !

Marathi Kavita on Ayushya – Mukhavate | मुखवटे

मुखवटे

विश्वास ठेवायचा कुणावर,
प्रत्येक चेहऱ्यावर एक मुखवटा आहे.
खरं समजायचं कुणाला,
इथं प्रत्येकाचा चेहराच खोटा आहे.

वाटेवर सोबत चालायचं
वचन प्रत्येकजण देतो.
स्वार्थ निघून गेल्यावर
आल्या वाटेने निघुनी जातो.

इथे नाही कुणी कोणाचे,
सारेच स्वार्थी आहेत.
आपलं मतलब साधणारे,
सगळेच लाभार्थी आहेत.

कितीही गर्दीत असले हे,
तरीही ते सारे एकटे आहेत.
वरून हास्य दाखवणारे,
नकली ते मुखवटे आहेत…
नकली ते मुखवटे आहेत.

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक माहिती :
१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स

Marathi life poem, marathi kavita on ayushya, marathi poems on life inspiration, famous marathi poems on love, marathi kavita on life text, marathi inspirational short poems, marathi poem on life struggle.

marathirang.com
अंकिता सोनटक्के

नमस्कार, मी अंकिता तेलवणे सोनटक्के, महाराष्ट्र, रायगड-मोहोपाडा, कॉमर्स पदवीधर. माझा सर्वात आवडीचा छंद नृत्य आणि माझ्याच पुरता मर्यादित असलेला माझा दुसरा छंद म्हणजे माझे लेखन. मी मराठी रंग या ब्लॉगच्या मार्गाने तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा एक निर्मळ प्रयत्न आहे. मला आशा आहे आपणा सर्वांनाही आवडेल. धन्यवाद !

अंकिता सोनटक्के

नमस्कार, मी अंकिता तेलवणे सोनटक्के, महाराष्ट्र, रायगड-मोहोपाडा, कॉमर्स पदवीधर. माझा सर्वात आवडीचा छंद नृत्य आणि माझ्याच पुरता मर्यादित असलेला माझा दुसरा छंद म्हणजे माझे लेखन. मी मराठी रंग या ब्लॉगच्या मार्गाने तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा एक निर्मळ प्रयत्न आहे. मला आशा आहे आपणा सर्वांनाही आवडेल. धन्यवाद !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!