
स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita :
स्त्रिया समाजात निरनिराळ्या भूमिका साकारत असतात, या भूमिकां मुळे त्यांना स्वतःची वेगळी ओळखही मिळते. पण खरं तर नव्या ओळखीमुळेच ती स्वतःला हरवत जाते आणि तरीही ते आनंदाने स्वीकारते. असा आशय कवयित्रीने खालील कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कुप्रया वाचावा नक्की आवडेल. (स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita)

स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
कधी मुलगी, कधी बहीण, पत्नी, कधी आई,
अशा अनेक भूमिका मी निभावते….
पण या भूमिका निभावताना कधी कधी,
मी स्वतःला मात्र गमावते.
कधी आत्या, कधी मामा, काका, कधी दादा,
असे अनेक नातेवाईक मी कमावते,
पण या नात्यांच्या जाळ्यात कधी कधी,
मी स्वतःला मात्र हरवते.
कधी आई, कधी बाबा, पती, कधी मुलगा,
साऱ्यांच्या ईच्छांमधे माझे मन रमवते,
पण या सर्वांच्या ईच्छांमधे कधी कधी,
मी स्वतःची स्वप्न विसरते,
कधी मुलगी, कधी बहीण, पत्नी,कधी आई,
अशा अनेक भूमिका मी निभावते….
पण या भूमिका निभावताना कधी कधी,
मी स्वतःला मात्र गमावते…. स्वतःला मात्र गमावते.
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स
- Ekati Rahu De Mala | एकटी राहू दे आज मला| Best Marathi Poem - April 1, 2025
- Maitri – A Friendship Poem in Marathi | मैत्री - March 22, 2025
- Patriotic Poems in Marathi | देशभक्तिपर कविता मराठी-२०२१ - August 14, 2021