Marathi Charolya on Love : आपल्या आयुषयात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेम होय. हो एकमेव अशी अदृश्य वस्तू जी नेहमी आपल्या जवळ असते. आणि जी इरांसोबत वाटल्याने अजून वाढत जाते. हे प्रेमही किती प्रकारचे असते, आईचं मुलावर असलेले प्रेम, मुलाचं आईवरील प्रेम, भावाचं बहिणीवरील प्रेम, बहिणीचं भावावरील प्रेम, पती-पत्नीचे प्रेम. पण असे असले तरी या सर्वांचा एकाच गाभा आहे, तो म्हणजे आपुलकी, आपलेपणा, एकमेकांविषयी असलेला आदर. या भावनांन मधेच लपलेलं असतं ते प्रेम. म्हणून तर प्रेमाचा आवश्यता क्षणोक्षणी लागते. प्रेमाचा आपल्याला आधार वाटतो, प्रेम आनंद देतो, समाधींनी करतो. प्रेमामुळेच आयुष्याचा हा कठीण प्रवास शक्य होतो.
प्रेमळ चारोळ्या :
प्रेमाविषयी वाचायलाही आवडतो साऱ्यांनाच जसे, प्रेमळ चारोळ्या, प्रेम कविता, प्रेम वाक्य, प्रेम रचना. या लेखातही अशाच प्रकारच्या मराठी प्रेम चारोळ्या दिल्या आहेत, चला तर करूया वाचायला सुरुवात.

स्वप्न आहेस माझे तू.
सत्यात कधी उतरशील.
जितकं प्रेम तुझ्यावर करते मी,
तितकं प्रेम माझ्यावर कधी करशील?
.
➥ अंकिता सोनटक्के

पाहताच तुला क्षणात मी हरवले,
तुझ्या एका नजरेत घायाळ मी झाले,
पहिल्यांदाच वाटत होतं, असं काही मला,
तुझ्या प्रीतीच्या सागरात चिंब मी न्हाले.
.
➥ अंकिता सोनटक्के

दूर आहेस आज तू ,
कधी समोर येशील का ?
एक विचावंसं वाटतं,
तू माझा होशील का ?
.
➥ अंकिता सोनटक्के

कळत नकळत न जाणे काय झाले,
कधी तू माझा नी मी तुझी झाले,
भानावर आले तेंव्हा मला कळले,
आज मी माझी ना राहिले.
.
➥ अंकिता सोनटक्के

तुझ्या साठी साजणा मी स्वतःला सजवावे,
तुझ्या डोळ्यात मी स्वतःला हरवावे,
डोळे मिटुनी, तुला स्वप्नात पाहावे,
डोळे उघडताच तुझ्या मिठीत मी असावे.
.
➥ अंकिता सोनटक्के
अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स
Complete information about Marathi Charolya on love : Marathi prem kavita, Marathi poem, Marathi poem on love, love poem in marathi, Marathi love poem, romantic poem in marathi, marathi charolya, Love poem in Marathi.
- Pahili Zalak Marathi Poem : Best Marathi Love Poem #1 - May 20, 2025
- Yad Lagala Ga Lyrics in Marathi – Sairat – याड लागलं ग | Best Lyrics #1 - May 13, 2025
- Bhabad Sapan Lyrics – Paru Marathi Serial | भाबडं सपान पाहू दे ! - April 12, 2025