Bharat Bhumi Mazi | भारत भूमी माझी | Patriotic Poem
Bharat Bhumi Mazi | भारत भूमी माझी | Patriotic Poem
Bharat Bhumi Mazi | भारत भूमी माझी | Patriotic Poem in Marathi.
भारत भूमी माझी
अंतहीन आकाशा खाली, जिथे सूर्यची किरणे चमकली,
जिथल्या जनाच्या जीवनात, ज्या भूमीने आशा जागवली.
एक स्वप्नातली आस होऊन, बहू तेज रंगानी बहरली,
अशी भारत भूमी माझी, शूर लढ्याने स्वतंत्र्य झाली.
काळ्या मातीचे शेत, शूरांच्या रक्ताने लाल झाले,
ज्यांनी गुलामीस दिला नकार त्यांस बेहाल केले.
त्यांच्या प्रत्येक पावलांनी, श्वासांनी आहुती मोजली,
स्वप्न स्वातंत्र्याचे कोरण्यास, प्रतिष्ठा पणास लावली.
दडपशाहीच्या साखळ्यांतुन, उठण्याचे धाडस केले,
डोळ्यात आग पेटून, धैर्यास ज्यांनी शस्त्र केले.
निराशेच्या अंधारात, ज्यांनी प्रकाश ज्योत पेटवली.
अदृश्यित भवितव्याची, जयांनी मुहूर्तमेढ रोवली.
प्रेमासाठी माय भूमीच्या, जे होते तयार मारण्यास.
प्रतिध्वनी बलिदानाचे, पुरे आम्हा प्रेरित करण्यास.
अजूनही गुंजते कानात, ललकारी ज्यांनी मारिली
या स्वतंत्र भारताची आग, हृदयास ज्यांनी लाविली.
अजूनही शहारून उठतो आमच्या अंगावरती काटा,
डोके धरून उंच वादळात, तुडविल्या ज्यांनी वाटा.
त्यांच्या स्वप्नाचे सुख आज तू उघड्या डोळ्यांनी भरून घे,
स्वातंत्र्याचे रक्षण करणे, स्वतःचे अंतिम ध्येय करून घे.
भारता, हे भारता, तुझा आत्मा घेतो उंच भरारी,
तुझ्या ध्वजाच्या रंगते, आजही दुनिया सारी.
तुझ्या कीर्तीचे, तुझ्या यशाचे, पोवाडे गाईन मी.
तुला जपण्यास कायमचे, वचन बद्ध राहीन मी.
➥ संतोष भरणुके
Bharat Bhumi Mazi | भारत भूमी माझी | Patriotic Poem
Marathi Prem Kavita-3 | Love Poem In Marathi | मराठी प्रेम कविता
इतर माहिती :
For Credit Card Apply here:
अधिक आकर्षक लेखांसाठी आमचे अनुसरण करा आणि जग एक्सप्लोर करण्यासाठी कनेक्ट रहा मराठी रंग सोबत. चला संवाद आणि समजूतदार पणाची शक्ती स्वीकारूया.
अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स.
➥ Learn What is credit card – Infolips.