Kavita Marathi Love Poem In Marathi | Marathi Short Poems |

Kavita Marathi : Eka Nadichya Kathavar
एका नदीच्या काठावर
एका नदीच्या काठावर, मासे करतात नृत्य जिथे,
एक प्रियकर पाहतो वाट, ज्याचे हृदय पाण्या मध्ये.
या लाल गुलमोहराच्या, दाट गडद छाये खाली,
पाहिली प्रेमाची स्वप्ने, ये आता वेळ खूप झाली
हा संथ नदीचा प्रवाह, जसा एक रेशमी धागा,
प्रतिबिंबित होते सारे, असो कितीही मोठी जागा.
त्या एक-एक लहरी, मोजत बसलो खाली,
जाता सूर्य अस्ताला, जणू वेळ स्थिर झाली.
सावल्यांच्या नृत्यात, बघ पक्षी लागले उडू
लुप्त होणार्या उजेडात, आशाही लागली झडू,
सळसळणाऱ्या पानांत, चाहूल वाटे मज तुझी,
प्रत्येक क्षण आनंदाचा, होऊ लागला कमी,
वाहणारा गार वारा, नदीची ही सौम्य धारा,
कुजबुज करी कमी, ढाळणाऱ्या सूर्याचा पारा.
शांतता राग तिचा, नव्याने आळवू लागली.
प्रेमाची विणलेली स्वप्ने, धूसर होऊ लागली.
या लाल गुलमोहराच्या, दाट गडद छाये खाली,
पाहिली प्रेमाची स्वप्ने, ये आता वेळ खूप झाली ||
इतर माहिती :
For Credit Card Apply here:
अधिक आकर्षक लेखांसाठी आमचे अनुसरण करा आणि जग एक्सप्लोर करण्यासाठी कनेक्ट रहा मराठी रंग सोबत. चला संवाद आणि समजूतदार पणाची शक्ती स्वीकारूया.
Related topics:
1. Perfect World Travel Guide
2. 9 Most Popular EV Cars in the USA
3. 9 Best Things About Apple TV 4K – Third Generation
4. Think before You Renew Amazon Prime
5. Jimmy Carter: A Great Legacy
6. Memorial Day: Honoring the Sacrifice, Celebrating Freedom
School Site :
For English grammar and lot more : Smart School Infolips
Marathi Poems: Marathi Rang



- पेन आणि पेन्सिल | Pen Ani Pencil Marathi Poem | Bal Kavita in Marathi - August 14, 2025
- Shree Hanuman Chalisa – Full and Best | श्री हनुमान चालीसा - June 28, 2025
- Pahili Zalak Marathi Poem : Best Marathi Love Poem #1 - May 20, 2025