Marathi Kavita on nature:
Marathi Kavita on nature : निसर्ग : निसर्गाचे सौंदर्य, निसर्गाचे रूप, निसर्गात असलेली डोंगर दऱ्या, नद्या, नाले, आणि बरेच काही. अशी अलौकिक सुंदरता असलेला हा निसर्ग आज त्याचे सौंदर्य हरवत चालला आहे. अर्थात त्यास आपणच जबाबदार आहोत. निसर्गाचे सौंदर्य जपण्यासाठी आता निसर्गच स्वतः तुम्हाला आवाज देत आहे, त्यासाठी तुमची मदत मागत आहे. अश्या प्रकारचा आशय या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे, वाचा तुम्हालाही आवडेल कदाचित. धन्यवाद !
निसर्ग
माझं सौंदर्य कधी पाहिलंच नसेल,
माझा अनुभव कधी घेतलाच नसेल,
माझ्या कुशीत कधी येऊन पहा,
कधी मलाही तुम्ही जवळून पहा.
डोंगरांची वस्ती माझ्यात आहे,
झाडे-वेलींची गर्दी माझ्यात आहे,
नद्या, नाले, ओढे, धुंद ती हवा,
कधी माझ्या अंगणात येऊन पहा.
रिमझिम पावसात भिजून जा,
कधी गडद धुक्यात न्हाऊन जा,
लांब पारंब्यावर झुलत रहा,
कधी झऱ्यातून चालून पहा.
सुंदरता अजूनही माझ्यात आहे,
बस तुमच्या मदतीचा साथ पाहे,
आजही देईन तीच गार हवा,
किमान एक तरी झाड लावून पहा…
किमान एक तरी झाड लावून पहा.

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स
Marathi Kavita on nature |
- Pahili Zalak Marathi Poem : Best Marathi Love Poem #1 - May 20, 2025
- Yad Lagala Ga Lyrics in Marathi – Sairat – याड लागलं ग | Best Lyrics #1 - May 13, 2025
- Bhabad Sapan Lyrics – Paru Marathi Serial | भाबडं सपान पाहू दे ! - April 12, 2025
Amazing, but it looks more like a kind of song than a poem
Try to make it a little , short and sweet
Thank you very, will try in future. thanks for your suggestion.
But its really nice
I really appreciate it