Marathi Poem | Deva Mazya Jeevanat Ghadavi Vari: Pandharichi Vari | जीवनात घडावी वारी :
नमस्कार मित्रांनो, मराठी रंगाच्या कविता या सादरा मध्ये आज आपण, एक भक्तिमय कविता पाहणार आहेत. विठ्ठलाची भक्ती आणि वारीला जाण्याची असलेली उत्कट इच्छा, या भावनेतून माझ्या मनातील इच्छा शब्द बनून येथे लिहिल्या आहेत. वारीला अजून पर्यंत न जाता आल्यामुळे मनातील राहिलेली खंत, मनाच्या व्यथा आणि वारीचा भक्तिमय प्रवासाचे वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे तुम्हाला आवडेल.
Marathi Poem; Marathi kavita, marathi kavita on life, mahatva kavita. Abhiman Maza Marathi – Marathi Poem | मराठी कविता : Deva Mazya Jeevanat Ghadavi Wari. the devotional poems of marathi.

जीवनात घडावी वारी :
विठ्ठल पाहण्या जावे पंढरी,
हाती दिंडीचा झेंडा, मुखी नाम हरी
योग असा यावा एकदा तरी
देवा माझ्या जीवनात घडावी वारी ।।धृ।।
पंढरीची वाट चालावी पावली,
घेऊन पालखी पाऊले धावली
भक्तीची आस लागूदे माउली
तुझ्या कृपेची राहूदे सावली
खांदी घेऊन पालखी, येऊदे दारी
देवा माझ्या जीवनात घडावी वारी ।।१।।
टाळ मृदूंगाची साथ, दिंडी संगे,
भजन कीर्तनाचा खेळ, दिंडी संगे
सदा मुखी नाम तुझे, दिंडी संगे
विट्ठल नामचा घोष, दिंडी संगे
देव नामाचे सुख, पडावे पदरी
देवा माझ्या जीवनात घडावी वारी ।।२।।
हरी नामाचा गजर, एक एक पावली
सदा विठूचा जागर, ऊन असो सावली
हरिपाठ करीता करीता, भूक हरपली
चित्त माझे हरवले, पंढरीच्या राऊळी
पालखित शोभते तुझी स्वारी
देवा माझ्या जीवनात घडावी वारी ।।३।।
| Related : Marathi Bhasha Din Kavita | अभिमान माझा मराठी – Poem
| Related : Poem on Maharashtra in Marathi | जय महाराष्ट्र देशा
अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक माहिती :
१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स
- Pahili Zalak Marathi Poem : Best Marathi Love Poem #1 - May 20, 2025
- Yad Lagala Ga Lyrics in Marathi – Sairat – याड लागलं ग | Best Lyrics #1 - May 13, 2025
- Bhabad Sapan Lyrics – Paru Marathi Serial | भाबडं सपान पाहू दे ! - April 12, 2025
Khupach Sundar 👌👌