माहिती

New SIM Card In My Name| माझ्या नावावर किती सिम 1

How Many SIM Card In My Name: How to know Aadhaar card misused?

नमस्कार मित्रांनो, आज आपण marathirang.com च्या “माहिती” या सदराखाली आधार कार्डच्या नंबर वर देय्य केलेले सिम कार्ड किती आहेत, ते जाणून घेण्याची क्रिया माहित करून घेणार आहोत. आजच्या डिजिटल युगात, आपण अनेकदा बँकचे कर्जघेण्यासाठी, वायफाय कनेक्शन घेण्यासाठी, किंवा नवीन सिम कार्ड घेण्यासाठी किंवा अजून इतर कारणांसाठी आपले आधार कार्डे अनोळखी लोकांशी शेअर करतो. पण यामुले आपल्या आधार कार्डचा गैरवापर होऊ शकतो, हे ही लक्षात घेतले पाहिजे. बऱ्याचवेळा ह्या गोष्टी माहित होत नाहीत, किंबहुना आपण त्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. अशा असुरक्षिततेची आपण पडताळणी करून पहिली पाहिजे. एखाद्याने कर्ज घेण्यासाठी त्याचा वापर केला तर? एखाद्याने सिम कार्ड मिळवण्यासाठी तुमचे आधार कार्ड वापरले तर? (SIM Card In My Name)

आधार कार्डचा गैरवापर?

तुमच्या नावावर किती सिम कार्ड जारी केले आहेत ते तपासून घ्या. (SIM Card In My Name)
दूरसंचार विभागाने (DoT) 2018 मध्ये प्रति व्यक्ती मोबाइल कनेक्शनची संख्या 18 पर्यंत वाढवली आहे. यामध्ये सामान्य मोबाइल वापरासाठी 9 सिम आणि उर्वरित 9 M2M (मशीन टू मशीन) संप्रेषणासाठी समाविष्ट आहेत. 2019 मध्ये, तत्कालीन इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सर्व सिम कार्ड आधार क्रमांकाशी लिंक करणे अनिवार्य केले होते.



मोबाईल सिमची माहिती कशी मिळवावी?

मोबाईल सिम कार्ड जारी करण्यासाठी आधार क्रमांकाच्या अनधिकृत वापराच्या चिंतेतुन दूर करण्यासाठी, दूरसंचार विभागाने वापरकर्त्यांना त्यांच्या नावावर किती मोबाइल नंबर सक्रिय आहेत हे शोधण्यात मदत करण्यासाठी एक वेबसाइट सुरू केली.
तुमच्या आधार कार्डाविरूद्ध जारी केलेले सक्रिय सिम कार्ड शोधण्यासाठी पुढील प्रक्रियेचे अनुकरण करा: (SIM Card In My Name)

SIM Card In My Name

➼ tafcop.dgtelecom.gov.in पोर्टलवर जा
➼ नंतर तुमचा मोबाईल नंबर टाका
➼ ‘OTP विनंती’ साठी क्लिक करा
➼ एकदा तुम्ही ‘Request OTP’ वर क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला OTP पॅनलवर घेऊन जाईल
➼ दिलेल्या बॉक्समध्ये OTP नंबर टाका आणि नंतर ‘Validate’ वर क्लिक करा.
➼ आता तुम्ही तुमच्या नाव/आधार विरुद्ध वितरित केलेले मोबाईल नंबर/सिम कार्ड पाहू शकता

खाली दिलेली लिस्ट नीट पाहून घ्या, तुमच्या सूची मधील कोणताही अनोळखी क्रमांक दिसल्यास, डावीकडील चेक बॉक्सवर क्लिक करा आणि तो नंबर बंद करण्याची तक्रार करा. नंतर जो नंबर बंद करण्यासाठी तुम्ही स्वतः दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपनी सोबत फोने द्वारे किंवा भेट देऊन बंद करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. (SIM Card In My Name)

सहज वाटणारी ही गोष्ट आपल्याला महागात पडू शकते. कोणी आपल्या आधार कार्डवर नवा सिम घेऊ शकतो. त्यावर बेकायदीशीर काम केले जाऊ शकते आणि त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागू शकतो.

(SIM Card In My Name)

आम्हाला आशा आहे की तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल. जर आपणास या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील सांगा. कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !

अधिक माहिती:

१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स.

I hope you got the answer to a many questions like How can someone misuse my Aadhar card? Can Aadhaar can be misused? Can anyone misuse my Aadhar card details? Can money be stolen using Aadhar card? how to find how many sims are on my name? how many mobile number on my name? no of sim registered on my name? (SIM Card In My Name)

संतोष भरणुके
Marathi rang
संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!