Are Cooked Vegetables Healthier Than Raw भाज्या शिजवाव्या

Are Cooked Vegetables Healthier Than Raw: भाज्या शिजविणे : नमस्कार मित्रांनो आज आपण मराठीरंग (Marathirang.com) च्या आरोग्य या सदराखाली कोणत्या भाज्या कच्च्या खाण्यापेक्षा शिजवून खाणे अधिक योग्य, अधिक फायदेशीर आहे ते समजून घेणार आहोत. त्या भाज्या कोणत्या असणार आहेत आणि त्याचे कारण काय ते पाहून घेऊ. आता पर्यंत आपल्याला माहित असलेली माहिती खरी आहे की नाही यासाठी हा लेख तुम्हाला नक्की मदत करेल. चला तर पाहूया काय आहे वस्तुस्थिती.

5 Vegetables That Are Healthier Cooked Than Raw : ५ अश्या भाज्या, ज्या कच्च्या खाण्यापेक्षा शिजवल्याने अधिक आरोग्यदायी आहेत. कोणत्या भाज्या शिजवून खाव्यात?

माहिती:

आपल्यापैकी काहीजणांना कच्चे अन्न खाणे जास्त आवडते. पण खरंच हे योग्य आहे का? मान्सूनचे देशात आगमन झाले आहे, त्यामुळे बरेच लोक या हंगामात निरोगी राहण्याचे मार्ग शोधत असतात. मग ते हायड्रेटेड राहणे असो किंवा बाहेरील वस्तू खाण्यापासून स्वतःला दूर ठेवणे असो. तुमची रोगप्रतिकारक शक्ती अबाधित ठेवण्यासाठी तुम्ही अनेक नियम पाळू शकता. याशिवाय, तुम्ही कच्ची फळे आणि भाज्या टाळल्या पाहिजेत, किमान पावसाच्या काळात तरी ते सोडले पाहिजे. रोगराई च्या दृष्टीने, पावसाळा हा सर्वात वाईट ऋतू आहे. या ऋतूत रोगराई पसरण्याचे प्रमाण इतर ऋतू प्रेक्षा थोडे अधिक असते. आपण ते जाणतोही कारण हवा दमट झालेली असते, जमिनीतीस ओलावा येतो, यामुळे जिवाणूंची वाढ झटपट होते. म्हणून या ऋतूत आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागते. आणि ती घेतलीच पाहिजे, जर तुम्हाला तुमचे आरोग्य राखायचे असेल तर. यासाठी भाज्या शिजवून खाणे फाद्याचे ठरते. तसे पाहता, बर्‍याच भाज्या शिजवल्या गेल्यावरच आपल्यासाठी खरोखर आरोग्यदायी असतात. त्यापैकी काही भाज्या आज येथे पाहणार आहोत.

टमाटे :

टमाटे शिजवल्याने “व्हिटॅमिन सी” ची पातळी कमी होते. हे खरे असले तरीही, ते शिजवल्याने इतर अनेक फायदे मिळतात. कच्चा टमाटे आपल्या सॅलडमध्ये असणे आवश्यक असले, म्हणून आपण तो कच्चा घेतो. ही भाजी शिजवल्याने त्याच्या सालींची जाड भिंती तोडण्यास मदत होते. यामुळे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट, लाइकोपीनची उच्च पातळी तोडण्यास मदत होते. यामुळे त्याचा संपूर्ण फायदा आपल्या शरीराला मिळतो. लाइकोपीन कर्करोग आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग यासारख्या दीर्घकालीन आरोग्य च्या समस्यांचा धोका कमी करण्यास मदत करतो.

रताळे:

रताळ्या मध्ये व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असतात. हे फायबर, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे देखील चांगले स्त्रोत आहे. हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. रताळे खाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे भाजून खाणे.

गाजर:

गाजर आपलय जेवणाच्या सॅलड मधील हा मुख्य घटक, नाव वाचून आश्चर्य वाटले असेल ना? पण हे खरं आहे. शिजवलेल्या गाजरांमध्ये कच्च्या स्वरूपाच्या गाजरां पेक्षा कॅरोटीनॉइड बीटा-कॅरोटीन जास्त असते. आपले शरीर बीटा-कॅरोटीनचे “व्हिटॅमिन ए” मध्ये रूपांतरित करते. व्हिटॅमिन ए मुळे दृष्टी, हाडांची वाढ आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. तसेच गाजर तळून तयार केल्या जाणाऱ्या पाककृती टाळण्याचा प्रयत्न करा. कारण तळल्यामुळे कॅरोटीनोइड्सचे प्रमाण कमी होते.

भोपळी मिरची:

भोपळी मिरची मध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचा गुणधर्म असतो. भोपळी मिरची आपल्या आहारात असणे ही एक उत्तम जोड आहे. भाजीपाला उकळण्याऐवजी किंवा वाफवण्याऐवजी ते शिजवल्याने पेशींच्या भिंती तोडण्यास मदत होते. यामुळे भोपळी मिरचीमधील कॅरोटीनोइड्स शरीराद्वारे शोषून घेणे सोपे होते. म्हणून भोपळी मिरची ची भाजी शिजवून खाणे हाच सर्वात उत्तम उपाय आहे.

मशरूम:

मशरूम म्हणजे पोषक तत्वांचे एक पॉवर हाऊस आहे. याला उष्णता दिल्याने त्याचे अँटिऑक्सिडंट चे गुणधर्म वाढण्यास मदत होऊ होते. उष्णते मुळे मशरूममधील विशिष्ट विषारी पदार्थ मुक्त होण्यास देखील मदत होते. जसे की ऍगारिटाइन, संभाव्यतः कर्करोगास कारणीभूत असते ते नष्ट होते. शिजवलेल्या मशरूममध्ये कच्च्या मशरूमपेक्षा झिंक, पोटॅशियम आणि नियासिनचे प्रमाण जास्त असते.

सर्वात चांगली गोष्ट म्हणजे : या सर्व भाज्या विविध पाककृतींमध्ये आपण सहजपणे वापरु शकतो. तर तुम्ही प्रथम कोणती भाजी वापरणार आहात? कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा.

आम्हाला आशा आहे की तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल. जर आपणास या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील सांगा. कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !

अधिक माहिती :

१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स

Tags: We tried to give the information to get answers like What vegetables to eat raw or cooked? Raw vs cooked vegetable digestion chart,
Does cooking vegetables reduce fiber? Is eating raw vegetables good for you? Vegetables that are healthier raw?
Which vegetables are healthier cooked? Fact or Fiction: Raw Veggies are Healthier than Cooked Ones?

Now we understand that the Cooked Vegetables vs Raw Vegetables: Which is Healthier? Raw vs. Cooked: How to Get the Most Out of Your Vegetables?
Are raw vegetables healthier than cooked vegetables? Vegetables That Are Healthier For You Cooked Than Raw? Raw vs Cooked: The Healthiest Ways to Eat Your Veggies? Raw or Cooked Veggies? Best Way to Unlock Nutrients. So please share with your friends to know them.

Marathi rang
संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x