Best Marathi Prem Kavita Athavan Yete| मज तुझी आठवण येते
Best Marathi Prem Kavita Athavan Yete| मज तुझी आठवण येते : असाच एकांतात मी बसलो असताना, आकाशाकडे पाहताना जे विचार मनात आले, ते लिहायचे ठरविले आणि त्या वेळी, बसल्या ठिकाणा पासून घरी येण्या पर्यंत जे घडले व पहिले ते शब्दात लिहिले. आणि मग आणखी फुले ओवून कवितेची माळ तयार केली. वाचा तुम्हालाही आवडेल. धन्यवाद ! (Maj tuzi athavan yete!)

मज तुझी आठवण येते : (Best Marathi Prem Kavita)
आकाशातील चांदणी पाहता, मज तुझी आठवण येते.
दूर कधी क्षितिजाकडे पाहता, मज तुझी आठवण येते.
निर्जन वाटेत कुणी कुजबुजता, मज तुझी आठवण येते.
मालाच माझे दर्पणी निरखता, मज तुझी आठवण येते ।। धृ ।।
चंद्र आणि चांदणी शितल, प्रकाशमय प्रेमाची साक्ष देतात.
आकाश आणि पृथ्वी त्याग, स्थिर प्रेमाची ग्वाही देतात.
एक रात्रीची वाट पाहत, सतत आकाशी फिरत राहतो,
तर एक दिवस-रात्र अखंड दूर असूनही जवळ भासतो.
आपलं प्रेम याहूनही पुढचं असावं, ना वाट पाहावी, ना दुरी यावी.
गार वाऱ्याची चाहूल अनुभवता, मज तुझी आठवण येते.
झाडांची हलणारी पाने पाहता, मज तुझी आठवण येते.
पाण्यावर उठणारे तरंग पाहता, मज तुझी आठवण येते. ।।१।।
तुझं रूपच इतकं भावलं आहे, की मनातून पुसत नाही.
डोळ्यात साठवलेली तुझी प्रतिमा, जराही मिटत नाही.
हृदयात बसविलेली तुझी स्मृती, कणभर ढळत नाही.
स्वप्नात बसविलेली तुझी कृती, क्षणभर विरळत नाही.
तू सदैव माझ्या हृदयात असावी, ना कधी ढळावी, ना कधी मिटावी.
दाट धुक्याचा पडदा पाहता, मज तुझी आठवण येते.
पात्यावरचे दवबिंदू पाहता, मज तुझी आठवण येते.
कुट्ट-काळोखी काजवे चमकता, मज तुझी आठवण येते. ।।२।।
धिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स
- Best 9 Exotic Fruits |9 विदेशी फळे जी तुम्ही पाहिली नसतील: - May 20, 2023
- Put a clove of garlic inside the toilet | टॉयलेट साठी Perfect उपाय - May 17, 2023
- Best Biography of Chhatrapati Shahu Maharaj – - May 6, 2023