Best Family Related Poems in Marathi | मी कुटूंबाशिवाय कुणीच नाही !
Family Related Poems | मी कुटूंबाशिवाय कुणीच नाही
नमस्कार मित्रानो, हि कुटुंब संबंधित कविता (Family Related Poems) आहे, “हे कवितेचे अन्वेषण आहे जे कुटुंबातील आपले बंध, अनुभव आणि भावना यांना दर्शविले आहे. हि कविता कुटुंबातील सदस्यांमध्ये सामायिक केलेले माझे प्रेम, आनंद, आव्हाने आणि त्या प्रेमळ क्षणांची साक्ष देतात. पालकांच्या मार्गदर्शनाच्या उबदार पणातून भावंडांच्या चंचल कृत्यांबद्दल, हि कविता, कौटुंबिक ऐकतेस, साधेपणा आणि सहजतेस परिभाषित करते. कुटुंबातील वैविध्यपूर्ण आणि अर्थपूर्ण संबंध प्रतिबिंबित करताना मला खूप भारावून आले होते. कौटुंबिक संबंधांचे सौंदर्य आणि भावनिक गुंतागुंत, प्रकाशित करणाऱ्या या काव्यात्मक प्रवासात आमच्यासह तुम्हीही सामील व्हा. चला तर पाहूया…
Family Related Poems | मी कुटूंबाशिवाय कुणीच नाही
\\ मी कुटूंबाशिवाय कुणीच नाही ! \\
कितीही पैसे खर्चून चांगली माणसे विकत घेता येत नाही।
आणि आईवडिलांसारखी माया कुठेच मिळत नाही।
हॉटेलच्या बिर्याणीला घरच्या खिचडीची चव येणार नाही|
आणि भावंडांसारखी माया, इतरांत मिळणार नाही |
साडीतलं सौदर्य कुठल्याच पोशाखात दिसत नाही
आणि साधेपणात राहण्या सारखं दुसरं सौदर्य नाही!
शेताची सर बागेला, बागेची सर टेरेसला येत नाही |
आणि भाजी-भाकरीची चव पिझ्झा बर्गरला येत नाही ।
कितीही कलमं करा, गावठी गुलाबाची तोड नाही
आणि कितीही अत्तरं घ्या त्यास जाई, जुई ची सर नाही ।
स्वतः सांगितल्या शिवाय प्रेमासारखं निरागस प्रेम नाही |
आणि जीवनात प्रेमळ जोडीदारासारखा दुसरा आधार नाही।
कितीही परिश्रम करा दैवाशिवाय काही मिळत नाही |
आणि ईश्वराच्या आज्ञेपुढे कुणाचंच काही चालत नाही ।
कितीही पैसे असु द्या माणूस एकाकी राहू शकत नाही |
आणि माणसांशिवाय माणसास माणूसपण मिळत नाही ।
खरं प्रेम केल्याशिवाय प्रेमाची गोडी कळत नाही |
आणि आवडत्या व्यक्तिशी बोलल्याशिवाय मन मोकळं होत नाही.
अनुभवासारखा जगात दुसरा शिक्षक नाही |
आणि जगल्याशिवाय कुणाला आयुष्यच समजत नाही।
शालीनतेसारखा दुसरा दागिनाच नाही |
आणि परोपकारासारखं पुण्य कशातच नाही ।
सुखाच्या क्षणी आपल्या माणसां शिवाय शोभा येत नाही |
आणि दुःखाशिवाय आपलं कोण, ते कळत नाही |
भक्त्तीसारखी शांतता इतर कशातच नाही |
आणि भगवंताएवढं बलवान अखंडात कुणी नाही ।
मुलांशिवाय घराला शोभा येत नाही |
आणि नातवंडासारखा परमानंद जगात नाही |
घरची माया वृद्धाश्रमात कधीच मिळत नाही |
आणि म्हातारपणी मी कुटूंबाशिवाय कुणीच नाही |
— Santosh Bharnuke
Family Related Poems | मी कुटूंबाशिवाय कुणीच नाही
इतर माहिती :
For Credit Card Apply here:
अधिक आकर्षक लेखांसाठी आमचे अनुसरण करा आणि जग एक्सप्लोर करण्यासाठी कनेक्ट रहा मराठी रंग सोबत. चला संवाद आणि समजूतदारपणाची शक्ती स्वीकारूया.
Related topics:
1. Perfect World Travel Guide
2. 9 Most Popular EV Cars in the USA
3. 9 Best Things About Apple TV 4K – Third Generation
4. Think before You Renew Amazon Prime
5. Jimmy Carter: A Great Legacy
6. Memorial Day: Honoring the Sacrifice, Celebrating Freedom
School Site :
For English grammar and lot more : Smart School Infolips
Marathi Poems: Marathi Rang