Marathi Kavita on love life – Sakhi Ga| मराठी कविता सखी गं

Marathi Kavita on love life of women – Sakhi Ga| मराठी कविता सखी गं :

हिंदू समाजातील स्त्रिया, त्यांच्यावर होणारे अन्याय, बंधन निमूटपणे सहन करत असतात. ही बंधन किती पाळायची, त्याची मर्यादा किती ठेवायची आणि आपली संस्कृती, परंपरा आणि संसार सांभाळून स्वतःचे अस्तित्व कसे टिकवून ठेवायचे याविषयी या कवितेत सांगितले आहे. स्वतः आयुष्यात गुरफटून न जाता, त्यातूनही वेळ काढून, मार्ग काढून स्वतःची ओळख कशी निर्माण करावी, यास प्रोत्सहन देणारी ही कविता आहे. वाचा तुम्हालाही आवडेल. धन्यवाद!

Marathi Kavita on love life

Marathi Kavita on love life – Sakhi Ga| मराठी कविता सखी गं :

सखी गं….

चल एकदा पुन्हा,
अनोळखी होऊया
पुन्हा नव्याने ये,
स्वतःलाच गवसुया

हरवलेला आत्मविश्वास
चल पुन्हा सांधुया
विझलेल्या आगीला त्या
पुन्हा धगधगत ठेवूया

चल शोधुया अस्तित्व स्वतःचे
महत्व स्वत्वाचे पारखूया
निखाऱ्यांची पायघडी आता
चल पुष्पमालांत बदलूया

उपभोगाची वस्तू नाही
ना मिळकतीचे साधन.
ना कुणाची दासी तू
जप स्त्रीत्वाचे आंदण

मुक्त, स्वच्छंदी, आनंदी हो
मोकळा श्वास घे भरून ऊरात
आता शोध घे तिचाच पुन्हा
जीला दडवलसं खोल मनात

उमेद हीच खरी शिदोरी
तुझीच तू गं सखी खरी
बळ यावे वाटे पंखात
तर कर तयारी पुन्हा जोमात

काय बिशाद तुला पाडणार
हिम्मतच जगात तुला तारणार
कितीही घाव झाले जरी
आता पुन्हा न डगमगणार

तुझ्या मनाशी खेळण्याचा
ना कुणाला अधिकार
ठामपणे नाही बोलण्याचा
कर आज मनाशी निर्धार

प्रिय सखी गं, ठेव हे सदैव ध्यानात
प्रेम द्यावे ज्यांना, आदर मिळावा त्या बदल्यात
नाहीच ठेवला त्यांनी तो, तरी ठेव तुझ्या पदरात
आत्म्याचा अभंगपणा, आहे तुझ्याच हातात
आहे तुझ्याच हातात ……..

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक माहिती :
१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स

Marathi life poem, marathi kavita on ayushya, marathi poems on life inspiration, famous marathi poems on love, marathi kavita on life text, marathi inspirational short poems, marathi poem on life struggle.

marathirang.com
प्रियांका रोठे

नमस्कार, मी प्रियंका रोठे, महाराष्ट्र, ठाणे. मी यशस्वीरित्या माझ्यातील लेखनाचे प्रेम जपले आहे. पुस्तकांबद्दल माझे प्रेम बालपणातच विकसित झाले. मी शाळेच्या ग्रंथालयातून पुष्कळ पुस्तके वाचत होते. तेथून मला लेखनाची आवड आणि सवयही लागली. मला माझे विचार मातृभाषा, मराठीतुन लेखणीच्या साह्याने स्पष्ट करायला आवडतात. मला आशा आहे की तुम्हीही याचा आनंद घ्याल. धन्यवाद !

प्रियांका रोठे

नमस्कार, मी प्रियंका रोठे, महाराष्ट्र, ठाणे. मी यशस्वीरित्या माझ्यातील लेखनाचे प्रेम जपले आहे. पुस्तकांबद्दल माझे प्रेम बालपणातच विकसित झाले. मी शाळेच्या ग्रंथालयातून पुष्कळ पुस्तके वाचत होते. तेथून मला लेखनाची आवड आणि सवयही लागली. मला माझे विचार मातृभाषा, मराठीतुन लेखणीच्या साह्याने स्पष्ट करायला आवडतात. मला आशा आहे की तुम्हीही याचा आनंद घ्याल. धन्यवाद !

guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x