Marathi Koligeet | मराठी कोळीगीत होरी लक्ष्मी आमची
Marathi Koligeet | मराठी कोळीगीत : महाराष्ट्रातील कोळी लोकांचे हे लोकगीत आहे. आम्हा कोळी लोकांसाठी आमची होडी ही एक दैवतच असते. याच होडीची गुणविशेष सांगणारे आणि होडीची शोभा वाढवणारे हे गीत आहे. आशा करतो तुम्हालाही आवडेल. धन्यवाद !
Marathi Koligeet | होडी लक्ष्मी आमची :
होरी लक्ष्मी, होरी लक्ष्मी आमची
होरी आमची ही नवलाईची
शान जणू ह्या कोलीयांची
रंगांनी रंगवा, फुलांनी सजवा
पहा शोभा ह्या होरीची
होरी लक्ष्मी, होरी लक्ष्मी आमची ।।१।।
दर्यावरी कशी डोलतसे
लाटांना चिरून चालतसे
आलाय वारा, शिडाला सावरा
पहा कसब ह्या होरीची ….
होरी लक्ष्मी, होरी लक्ष्मी आमची ।।२।।
तयार व्हा तुम्ही बारा गडी
मचाणीला ही आली होरी
गोस हाकरा, दमान पकारा
पहा मजा या होरीची
होरी लक्ष्मी , होरी लक्ष्मी आमची ।।३।।
हि कविता जर तुम्हाला आवडली असेल तर, स्वतः पुरती न ठेवता इतरांनाही सामायिक करा (Share) करा. आपला अभिप्राय मात्र नक्की द्या. धन्यवाद !
अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स
मराठी कोळीगीत : marathi song, koligeet gani, koligeet songs, koligeet marathi gane, marathi gane koligeet, koligeet non-stop,