Marathi Poem for Kids | मराठी कविता चांदोबा तू असा रे कसा

Marathi Poem for Kids Chandoba tu asa re kasa| मराठी कविता चांदोबा तू असा रे कसा : लहान मुलांच्या मनातील सर्वात आवडती गोष्ट म्हणजे चंद्र, होय आपला चांदोबा. एक दिवस ते चक्क चांदोबाशी गप्पा मारतात. गप्पा मारताना ते चांदोबाकडे खेळायला जाण्या ऐवजी चांदोबालाच खाली यायला संगतात. तुझ्या पेक्षा आम्ही इकडे किती मजा करतो ते सांगतात, आणि तू जर इकडे आलास तर तुलाही आमच्या बरोबर मजा करायला मिळेल हेही सांगतात. चला वाचू या ही छानशी कविता, नक्की आवडेल तुम्हाला. धन्यवाद !

Marathi poem for kids

चांदोबा :

चांदोबा चांदोबा, तू असा रे कसा,
जवळ या जरा, असे समोर बसा ।। धृ ।।

खूप छान दिसता, तुम्ही फार दुरून,
असे काय पाहता, लहानांना वरून.
कधीतरी तुम्ही या, जमिनीवर जरा,
हसा, खेळा खूप-खूप मजा करा. ।।१।।

कोणी म्हणे तुमच्या सोबत ससा राहतो.
दुडू-दुडू धावतो नी पळा-पळ करतो.
रोज त्याच्या सवे खेळून होत नाही बोर,
आम्ही पोरं येथे, बघ करतो किती शोर ।।२।।

याल जर खाली, तर छान जाईल वेळ,
रोज रोज खेळू , आपण नवा नवा खेळ,
कधी खेळू लपा-छुपी, कधी शिवणापाणी,
कधी सांगू गोष्टी, तर कधी गाऊ गाणी ।।३।।

चांदोबा चांदोबा, तू असा रे कसा,
जवळ या जरा, असे समोर बसा ।। धृ ।।

कविता आवडली असेल तर, तुमच्या मुलांनाही वाचायला सांगा आणि त्यांना शाळेत ऐकविण्यास सांगा. त्यांनाही या नवीन कवितेची मजा घेता येईल. काही सूचना असल्यास जरूर कळवा. तसेच कविता स्वतःपुरतीच न ठेवता आपल्या मित्रांसोबत सामायिक करा. आपला अनमोल वेळ दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद !

Marathi Poem for Kids | मराठी कविता चांदोबा तू असा रे कसा :

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक माहिती :
१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स

Marathi rang
संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x