Marathi Poem on Mother | आई – मराठी कविता
Marathi Poem on Mother | आई – मराठी कविता : | Poem for Mother | Aai : आई विषयी सुंदर कविता लिहावी हे फार दिवस ठरवून होते. आई वर कविता, मराठीत खूप जणांनी लिहिल्यात, अजून लिहितील आणि लिहितच राहतील. हा विषयच तितका जिव्हाळ्याचा आहे. आई वर सुंदर कविता करावी असं जेंव्हा वाटलं, तेंव्हा सर्वात अगोदर आई वर चारोळी सुचली, मग तिचंच पुढे कधी कविता झाली हे मला ही कळलं नाही. छान लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. वाचा तुम्हालाही आवडेल. धन्यवाद !
Marathi Poem on Mother | आई – मराठी कविता :
आई
रम्य ते बालपण पुन्हा मिळावे वाटते
कुशीत शिरून आई तुझ्या निर्धास्त निजावे वाटते
इवलसं घरकुल खेळण्यातला संसार
किती छान होतं तेव्हा माझं निरभ्र आभाळ
तुझा हातचा तो गोड खाऊ तो गावरान मेवा
काळजाच्या कुपीत जपलाय आठवणींचा ठेवा
सोप्पं साधं सरळ होतं तेव्हा सर्वकाही
वाटे जगात तेव्हा अशक्य काहीच नाही
निरागस मन तेव्हा सुंदर स्वप्न विणत राही
भाबडी श्रद्धा आपली खरं त्यांनाच मानी
आता कळतंय जगात सर्वच शक्य होत नसतं
आपल्या हातात नसलेलं बरंच काही असतं
माया तुझी, तुझं वात्सल्य विकत घेता येत नाही
तुझ्या असण्यातला आधार, दुसरा कुठेच येत नाही
मी आहे तुझ्या सोबत हे वाक्य काय असतं
त्यातलं सामर्थ्य तू नसताना खरं कळतं
तू माझा निवारा तूच माझी विश्रांती
तुझा पदर टिपून घेतो सारीच आसवे माझी
आठवतंय तुझं प्रेमाने ते कुरुवाळणं
चिऊ-काऊ चा घास मायेने चारणं
तुझं प्रेम जणू चांदण्यांची शीतलता
थंड शिडकावा करते यातनांनी होरपळता
अपार कष्टांनी उभं केलंस इवलसं जग आपलं
नव्या जगात माझ्या मीही तेच सारं जपलं
ममत्वाचा वारसा हा आता पुढे जातोय
आईपण तुझे आता आम्ही खरं अनुभवतोय
आईपण निभावणं तारेवरची कसरत
सावरून घेशील ना सर्व माझ्यासोबत
तू असताना कसली चिंता अन काळजी
माझ्या जीवनरथाची तूच तर सारथी….
… तूच तर सारथी….
अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi Arati
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स
short poem on mother in marathi, small poem on mother in marathi, short marathi poem on mother, poem on mother earth in marathi. poem on mother in marathi, small poems on mother in marathi, marathi poems on mother images, marathi short poems on mother. Great Marathi Kavita. आई कविता संग्रह मराठी, मराठी कविता आई बाबा, आई विषयी कविता, आई मराठी कविता.
- Best Marathi Poem | Lek Aamchi Ladachi | लेक आमची लाडाची - March 12, 2024
- My Family Poem in Marathi | Mhatarpan | म्हातारपण - February 28, 2024
- Marathi Kavita Prem | Prem Kavita - December 14, 2023