Marathi prem kavita | परिमळ – मराठी कविता : प्रियकर, प्रेयसीच्या जवळ नसताना, तिच्या मनात येत असलेले विचारांना, शब्दांचे रूप देऊन या कवितेतून मांडलेलं आहेत. नव्या-नव्या प्रेमाचा हा पहिला भाव, तुम्हालाही वाचायला आवडेल. धन्यवाद !

परिमळ
तू नसताना भास तुझाच फक्त
तू असताना क्षणही स्तब्ध
तुझीच ओढ मनाला सतत
खोल गुंतवी हृदयाला तुझ्यातच
रातराणीच्या गंधाने भारून
दरवळे वारा मोहक सुगंधित
तसाच परिमळ तुझाच हवेत
मलाच माझे भासे गंधित
सहवास तुझा हवाहवासा
वेड लावी मज अविरत
तुझाच आवाज रुणझुणतो
अजूनही माझ्या कानांवर
तुझ्या जाण्याने दूर हरवले
सूर नव्याने ना गवसले
विरले संगीत तुझ्या-माझ्यातले
आजवर जे जीवापाड जपले
न बोललेले असेच काही
उरून राहिले शेवटासही
अबोल बोल ते कधीच कसे
तुला अन मला कळलेच नाही
आठवणींचा परिमळ तुझ्याच
असाच गंधित करी मज आज
सुगंध भरून राहिला आता
मनाच्या गाभाऱ्यात करुनि साज
धिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स
Marathi prem kavita, Love Poem In Marathi | मराठी प्रेम कविता, love poems Marathi. मराठी प्रेम कविता चारोळ्या, prem kavita marathi text, मराठी कविता प्रेमाच्या, कविता मराठी जीवन
- Zunjaar Marathi Kavita – Marathi Best Inspirational Poem |झुंजार मराठी कविता #1 - November 25, 2024
- Best Marathi Poem | Lek Aamchi Ladachi | लेक आमची लाडाची - March 12, 2024
- My Family Poem in Marathi | Mhatarpan | म्हातारपण - February 28, 2024