7 Best Places To Visit Near Kas Pathar | कास पठार
Places To Visit Near Kas Pathar | कास पठार जवळची पर्यटन स्थळे :
नमस्कार मित्रांनो, आज आपण marathirang.com च्या “पर्यटन” या सदराखाली “कास पठार व त्याच्या जवळ असलेली काही प्रसिद्ध पर्यटन स्थळे” याविषयीची माहित करून घेणार आहोत. महाबळेश्वर पासून जवळ असलेले हे सातारा जिल्यातील तेथील वेगवेगळ्या फुलांसाठी जग प्रसिद्ध आहे. याच्या जवळील ठिकाणाची माहिती देणारा हा लेख. कदाचित तुमच्या सुट्टीचे योग्य नियोजन करण्यासाठी आपल्या उपयोगी पडेल या उद्देशाने ही माहिती देत आहोत. Places to stay near Kaas plateau? Online booking for Kas pathar? kaspathar ticket booking? Kas Pathar flowers?
Table of Contents :
੧) एकीव धबधबा:
एकिव धबधबा, अटाळी फाट्यापासून साधारण ४ किमी अंतरावर आहे. हा धबधबा एकिव गावच्याजवळ असल्यामुळे ह्या धबधब्याला ऐकीव धबधबा म्हणतात. येथे पावसाळ्यात पर्यटकांची खूप गर्दी पाहायला मिळते. खास करून शनिवार-रविवार सुट्टीच्यादिवशी पर्यटकांची जास्त गर्दी राहते. पावसाचा व धबधब्याचा आनंद घेण्यासाठी, तसेच महत्वाचे म्हणजे धबधब्या खाली भिजण्यासाठी लोक येथे गर्दी करतात. (Placess to visit Kas Pathar)
੨) कास तलाव:
सरऱ्या पासून २५ किमी अंतरावर असणारे हे कास तलाव प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. सुमारे १०० वर्षापुर्वी बांधण्यात आलेला हा तलाव आजही सुस्थितीत आहे. नैसर्गिक सुंदरता, शांतता आणि ही इथली सर्वदूर पसरलेलं दाट वनराई, गार हवा यामुळे येथे वर्षभर पर्यटकांची गर्दी राहते. कोणत्याही ऋतूत भेट देण्यासाठी योग्य असलेले हे रमणीय स्थळ. एकदातरी भेट देऊन पाहावे असेच आहे. (Placess to visit Kas Pathar)
੩) ठोसेघर धबधबा
सरऱ्या पासून २० किमी अंतरावर असणारा हा ठोसेघर धबधबा. स्तरातील ठोसेघर या छोट्या गावाजवळ एक निसर्गरम्य ठिकाण आहे. खरतर येथे धबधब्यांची मालिका आहे, त्यापैकी काही १५ ते २० मीटर उंचीचे आहते, आणि एक साधारण २०० मीटर उंचीचा आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून लोक या भागात भेट देण्यासाठी येतात,
विशेषत: पावसाळ्यात, जुलै ते नोव्हेंबर. या हंगामात येथे मुसळधार पाऊस पडतो आणि त्यामुळे धबधब्यांचे प्रमाण जास्त आहे. पडणाऱ्या पाण्या मुळेच ते अधिक प्रेक्षणीय ठरतात. जवळचा परिसर शांत आणि हिरवागार आहे.
येथे जवळच एक पर्यटनाची जागा आहे, आणि नवीन बांधलेला चौथरा आहे. या ठिकाणाहून धबधब्याचे खुप सुंदर दृश्य पाहावयास मिळते. धबधब्याजवळ अनेक पक्षीही पाहावयास मिळतात. विशेषत: पावसाळ्यात. (Placess to visit Kas Pathar)
੪) सह्याद्रीनगर पवनचक्की प्रकल्प:
कास पाठार जवळच्या, अंधारी गावामधुन गेल्यावर सह्याद्रीनगर म्हणून एक गाव लागते. या गावाच्या शेजारी हा पवनचक्की प्रकल्प उभारण्यात आला आहे. उंच उंच खांब व त्यावर फिरणारी पाते, जवळून नेहलण्यास खूप मजा येते. त्यामुळेच येथे पर्यटकांना फिरण्यास परवानगी दिली आहे. त्याच बरोबर सह्याद्रीची डोंगरांगातील, आणि महाबळेश्वर जवळील थंड हवा या ठिकाणी अनुभवायला मिळते. (Placess to visit Kas Pathar)
५) वजराई धबधबा:
साताऱ्या पासून भांबवली गाव हे ३० किमी वर आहे. साताऱ्या पासून – बामणोलीला जाताना कास गावी उतरल्यावर, जवळच १० ते २० मिनिट अंतरावर भांभवली हे गाव आहे. झाडांच्या गर्दीत वसलेले भांभवली हे गाव खूपच सुंदर आहे .येथील प्रमुख आकर्षण म्हणजे वजराई धबधबा. हा धबधबा ८०० फुट उंचीवरुण खाली पडतो. समर्थ रामदासांनी हा वजराई माथा हा तीन पावलात गाठला अशी एक दंतकथा आहे. त्यामुळेच हा धबधबा हा ३ पायरी मध्ये पडतो असा समज आहे. हा परिसर खूप सुंदर असून हा ठिकाण कासपठारच्या अगदी जवळ आहे. (Placess to visit Kas Pathar)
६) घाटाई देवी मंदिर:
कास बामणोली रस्त्यावर सातारा शहरापासून जलपास २५ किमी अंतरावर असलेले हे सुंदर घाटाई देवीचे मंदिर. उंच डोंगर पठारवरच्या निसर्गरम्य परिसरात गर्द वनराईत वसलेले हे मंदिर पर्यटकांना वर्षानुवर्षे आकर्षित करत आहे. साताऱ्या पासून २२ किमी अंतरावर दक्षिणेस घाटवण फाटा जातो, तेथून ४ किमी डांबरी रस्ता आहे. त्या रस्त्याने गेल्यावर घाटाई देवी मंदिर लागते. हे देवस्थान स्वयंभू आणि जागृत आहे, भाविकांना याचा लाभ होत असतो. मंदिरभोवती गर्द वनराई, निसर्गाच्या सानिध्यात बसलेल्या अशा या जागृत देवस्थानास भेट देणारे भाक प्रसन्न होतात.
७) नवरा नवरीचा डोंगर:
कास पठारचे पूर्वेकडील टोक म्हणजेच नवरानवरीचा डोंगर. आटाळी गावच्या फाट्यावर उतरल्यानंतर १५ मिनिटात या डोंगरावर पोहचता येते. असे म्हणतात याठिकाणी एकदा निसर्गाचा मानपान न केल्यामुळे, लग्नाचे संपूर्ण वऱ्हाड गुप्त झाले तेव्हापासून या डोंगराला नवरा-नवरीचा असे नाव पडले. या डोंगरावरचे २ उंच दगड म्हणजेच नवरा-नवरी. नवरा-नवरीच्या डोंगरावरुन पूर्वेकडून पाहिल्यानंतर आपल्याला दिसतो ज्वालामुखीतून तयार झालेला पेट्टीचा गुत्ता. पश्चिमेला घनदाटजंगल, उत्तरेला कण्हेर धरणाचा जलाशय तर दक्षिणेकडे उरमोडी धरण व समर्थांचा सज्जनगड. या सर्व विलोभनीय दृश्यांमुळे हे ठिकाण जास्तच प्रसिद्ध आहे. (Placess to visit Kas Pathar)
आम्हाला आशा आहे की तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल. जर आपणास या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील सांगा. कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !
अधिक माहिती:
१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड
अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स