7 Secrets To Control Uric Acid|युरिक ऍसिड

How To Control Uric Acid | युरिक ऍसिड कसे नियंत्रित करावे (How Can I Reduce Uric Acid In My Body | मी माझ्या शरीरातील यूरिक ऍसिड कसे कमी करू शकतो). नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात युरिक ऍसिड म्हणजे काय? (What is Uric Acid?), शरीरात ते किती प्रमाणात असावे? प्रमाण कमी झाले तर काय होईल आणि प्रमाण जास्त झाले तर काय होईल? ते कसे नियंत्रणात आणावे, (How to control uric acid?), किंवा अशा परिस्थितीत काय करावे या सर्व प्रश्नांची आणि इतर सर्वसाधारण माहिती जाणून घेणार आहोत. उच्च यूरिक ऍसिड पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी या ५ ड्रायफ्रुट्सचा वापर करा?

How To Control Uric Acid: (युरिक ऍसिड कसे नियंत्रित करावे)

यूरिक ऍसिड म्हणजे काय? :

युरिक ऍसिड हे मूलत: आपल्या शरीरातील नैसर्गिक पाणी आहे, जे प्युरीनयुक्त पदार्थांच्या पचनाच्या वेळी तयार होते. प्युरीन म्हणजे कार्बन आणि नायट्रोजन-आधारित रासायनिक रेणू शरीरातील विभागत असतो.

जेव्हा मूत्रपिंड योग्य आणि कार्यक्षमतेने, शरीरात जमा झालेले यूरिक ऍसिड काढून टाकत नाहीत तेव्हा सामान्यतः यूरिक ऍसिडची पातळी उच्च स्थरावर जाते. शरीरात यूरिक असिडचे प्रमाण वाढत जाते. जेव्हा शरीरात यूरिक ऍसिड जास्त प्रमाणात राहते तेव्हा या स्थितीला हायपर युरिसेमिया म्हणतात. यामुळे युरिक ऍसिडचे स्फटिक तयार होतात जे सांध्यांमध्ये जाऊन स्थिर होतात आणि संधिवात होऊ लागतो. सांध्यांमध्ये असह्य वेदना होऊ लागतात. हे युरिक ऍसिड किडनीमध्ये स्थिर होऊन मुतखडा तयार करू शकतो. त्यामुळे शरीरात युरिक ऍसिड चे प्रमाण वाढणे खूप घातक आणि पीडादायी आहे. (How To Control Uric Acid)

|Related : 5G Services in India – New | भारतातील 5G सेवा (read more)

यूरिक ऍसिड चे प्रमाण कमी किंवा खाली कसे ठेवावे :

(How to decrease or lower uric acid) : कोणताही आजार कश्या मुळे होतो हे माहित झाल्यास त्यावर नियंत्रण करणे सहज शक्य होते. म्हणून जाणून घेऊया की युरिक ऍसिड चे प्रमाण शरीरात कश्या मुळे वाढते.

युरिक ऍसिड हे प्युरीन असलेल्या पदार्थांच्या पचनातून निर्माण होणारा नैसर्गिक कचरा आहे. काही पदार्थांमध्ये प्युरीन्स जास्त प्रमाणात आढळतात. जसे की, लाल मांस (मटण), अवयवयुक्त मांस, बांगडा (सार्डिन मासे) आणि बिअर. शिंपल्यांचे मासे, पोल्ट्री उत्पादन आणि शेंगा प्युरिन आपल्या शरीरात देखील तयार होतात आणि तुटून नष्ट होतात.

साधारणपणे, तुमचे शरीर तुमच्या मूत्रपिंडांद्वारे आणि लघवीद्वारे यूरिक ऍसिड फिल्टर करते. पण जर आपण आहारात जास्त प्रमाणात प्युरीन पदार्थांचे सेवन करत असाल, किंवा तुमचे शरीर हे पचविण्यास अपयशी ठरते असेल, तर तुमच्या रक्तात युरिक ऍसिड तयार होऊ शकते. परिणामी यूरिक ऍसिडची पातळी वाढते जाते. (how to get rid of uric acid and Control Uric Acid)

यूरिक ऍसिडची सामान्य पातळी :

(Normal limit or level of uric acid in your body/ purine lowering foods)

यूरिक ऍसिडची सामान्य पातळी 6.8 mg/dL पेक्षा कमी असावी.
उच्च यूरिक ऍसिड पातळी (6.8 mg/dL वर) असल्यास, त्यास हायपर युरेसेमिया असे म्हणतात.
युरिक ऍसिड अजून अनेक कारणांमुळे तुमच्या शरीरात जमा होऊ शकते. जसे केवळ आहार नसून, अनुवांशिकता, लठ्ठपणा किंवा जास्त वजन यामुळेही युरिक ऍसिडचे प्रमाण वाढते.

काही आरोग्य विकारांमुळे देखील यूरिक ऍसिडची पातळी उच्च स्तरावर जाऊ शकते, जसे :

➞ किडनी रोग
➟ मधुमेह
➞ हायपोथायरॉईडीझम
➟ काही प्रकारचे कर्करोग
➞ सोरायसिस
अश्या विविध आजरांमुळे ही युरिक ऍसिडचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.

यूरिक ऍसिडचे प्रमाण नवाढण्यासाठी काय करावे:

(How to Control Uric Acid)
Find tips to keep a low-purine diet here.

⧫ साखरेचे प्रमाण कमी करावे.
⧫ प्रक्रिया केलेले, हवाबंद केलेले खाद्यपदार्थ खाणे कमी करा.
⧫ रेडी-टू-कुक सारखे पदार्थ टाळा.
⧫ साखरयुक्त पेये घेऊ नका. जसे सोडा, थंडपेय.
⧫ अल्कोहोल युक्त पदार्थाचे सेवन काटेकोरपणे टाळा.

| Related: Meaning Of Cross X Symbol Behind The Train (read more…)

यूरिक ऍसिडचे प्रमाण कमी करण्यासाठी काय करावे?

(What to do for lower uric acid/ How To Control Uric Acid)

⧫ जास्तीत जास्त पाणी प्या
⧫ ताजी फळे खा
⧫ अधिक गव्हाचे पदार्थ खा.
⧫ कॉफी प्या.
⧫ वजन कमी करा.
⧫ रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवा.
⧫ फायबर युक्त पदार्थ खा.
⧫ चेरीचे सेवन करा.
⧫ व्हिटॅमिन C चे सेवन करा.

यूरिक ऍसिडचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी काय करावे:

(How to control uric acid/ what to do to Control Uric Acid or in uric acid )

ज्या लोकांमध्ये यूरिक ऍसिडचे प्रमाण जास्त आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि योग्य उपचारांद्वारे यूरिक ऍसिडची पातळी नियंत्रित ठेवल्याचे सुनिश्चित करावे. त्याचे स्तर नियंत्रित करण्यासाठी योग्य पोषण देखील निवडू शकतात. प्युरिनचे प्रमाण कमी असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. याबाबतीत सुका मेवा फायदेशीर ठरू शकतो.

उच्च यूरिक ऍसिड पातळी नियंत्रित करण्यासाठी, आपल्या घरातील काही सुका मेवा (Dry fruits) तुमची मदत करू शकतात.

कोणत्या ड्रायफ्रुट्सचे सेवन करावे:

(How to reduce uric acid without medicine)
युरिक ऍसिडची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी खालील ५ ड्रायफ्रुट्सचे सेवन केल्यास मदत होईल. (Foods to lower uric acid or Control Uric Acid) :

१. काजू

काजू प्युरीन्सचे प्रमाण कमी असते आणि ते खूप पौष्टिक असतात. काजू LDL कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात आणि आरोग्याला पोषक असे कोलेस्ट्रॉल, (HDL) देखील वाढवतात. खास करून यामध्ये महत्त्वपूर्ण जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. जे शारीराची कार्येक्षमता राखण्यासाठी आवश्यक असतात आणि सांधेदुखीचा त्रास असणाऱ्या रुग्णांसाठी उपयुक्त असतात.

२. अक्रोड

अक्रोडमध्ये भरपूर ओमेगा-३ असते आणि ते संधिरोगासाठी अनुकूल प्रथिनांचे स्त्रोत आहे. यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म देखील आहेत, शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी याची खूप मदत होते. उच्च यूरिक ऍसिड पातळी असलेल्या लोकांसाठी अक्रोड हे आवश्यक पोषक तत्वांचा अतिशय सुरक्षित आणि उत्तम स्त्रोत आहे.

३. बदाम

तुमच्या आहारात बदामांचा समावेश केल्याने शरीरातील युरिक ऍसिडची पातळी कमी होण्यास मदत होते. यामध्ये प्युरीन कमी असते आणि त्यात व्हिटॅमिन ई (E), मॅग्नेशियम आणि मॅंगनीज असतात. बदामाच्या त्वचेत अँटिऑक्सिडंट्स देखील भरपूर असतात, जे फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात.

४. आळशी (फ्लेक्ससीड्स)

आळशी मध्ये आवश्यक फॅटी ऍसिड भरपूर असतात जे आपले शरीर स्वतः तयार करू शकत नाही. आळशीच्या तेलाचा शरीरावर दाहक-विरोधी प्रभाव होतो. ज्यामुळे यूरिक ऍसिडच्या उच्च पातळीमुळे होणारी वेदना कमी होते. (For Control Uric Acid)

५. ब्राझील नट्स

यामध्ये भरपूर फायबर आणि कमी प्युरिन असतात. ते यूरिक ऍसिडची पातळी नियंत्रित करण्यात मदत करतात. सांधेदुखीच्या वेदनांपासून आराम देतात.

ड्रायफ्रुट्स आणि नट्स या व्यतिरिक्त, कमी प्युरीनयुक्त पदार्थ, जसे ताजी फळे आणि ताज्या भाज्या, अंडी, बटाटे आणि कमी चरबीयुक्त आणि नॉन-डेअरी फॅट पदार्थ यांचा समावेश करावा. जसे की दही आणि स्किम मिल्क. (These are ways to Control Uric Acid)

|Related: Ashadhi Ekadashi – In Marathi | आषाढी एकादशी संपूर्ण माहिती

महत्वाची सूचना :

(How To Control Uric Acid)
हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की कोणताही आजार असो, संतुलित आहार हा आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतो. मग ते यूरिक ऍसिडचे प्रमाण कमी करण्यास मदत करू शकतो.
आहार, व्यायाम आणि इतर निरोगी जीवनशैलीतील बदल सांधे दुखी आणि उच्च यूरिक ऍसिडच्या प्रमाणामुळे होणारे इतर आजार सुधारण्यास मदत करू शकतात. अर्थात, ते नेहमी आवश्यक वैद्यकीय उपचार बदलू शकत नाहीत.
तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेली सर्व औषधे घ्या. आहार, व्यायाम आणि औषधे यांचे योग्य संयोजनच तुमचे उच्च यूरिक ऍसिड पातळी कमी करण्यास आणि लक्षणे दूर ठेवण्यास मदत करू शकते.
तुम्ही काय खाऊ शकत नाही यापेक्षा, जे पदार्थ तुम्ही खाऊ शकता किंवा जे पदार्थ खायला हवेत त्यांची यादी बनवा.
घरगुती उपाय, तुमच्या तात्काळ वेदनांवर किंवा अधिक वाढलेल्या आजारावर परिणाम कारक ठरू शकणार नाही. योग्य तो निर्णय घेऊन स्वतःची काळजी घ्यावी.

.

आम्हाला आशा आहे की तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल. जर आपणास या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील सांगा. कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !
So this is everything about Control Uric Acid.

वेगळी माहिती :

१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड

कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स.

I think you got the answers to these questions How Can I Reduce Uric Acid Levels? how can I reduce uric acid in the body? More questions like how can I reduce my uric acid levels? how to reduce uric acid in my blood? high uric acid treatment. What causes high uric acid levels in the body? high uric acid symptoms? uric acid normal range, uric acid level agewise, effects of high uric acid? What can cause high uric acid levels?

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x