Jagannath Rath Yatra in Marathi | जगन्नाथ रथयात्रा – माहिती
Jagannath Rath Yatra Info in Marathi | जगन्नाथ रथयात्रा विषयी माहिती :
नमस्कार मित्रांनो आज आपण मराठीरंग (Marathirang.com) च्या भारतीय सण या सदराखाली पुरी येथे भगवान श्री जगन्नाथ रथयात्रे विषयीची माहिती घेणार आहोत. ही रथयात्रा कधी साजरी केली जाते, कोठे केली जाते? रथयात्रेची प्रथा कधी पासून सुरु झाली? ही यात्रा कशी साजरी केली जाते? असे आणि अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपण या लेखात पाहणार आहोत.
Table of Contents :
जगातील सर्वात जुनी रथयात्रा कोठे भरवली जाते.
श्री जगन्नाथाची पुरीची ही रथयात्रा म्हणजे एक उत्सव आहे. खूप मोठ्या प्रमाणावर ही यात्रा साजरी केली जाते. भारतातच नाही तर जगभरात हा उत्सव साजरा केला जातो. श्री जगन्नाथाचा हा रथ उत्सव दरवर्षी आषाढ महिन्याच्या, शुक्ल पक्षाच्या द्वितिये पासून ते दशमी पर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. ओडिशातील पुरी शहराच्या मंदिरापासून या यात्रेची सुरुवात होते. श्री जगन्नाथ, मंदिरातील प्रमुख देवता असते.
पुरीची ही रथयात्रा बहुप्रतिक्षित असलेला उत्सव आहे. सारे भक्तगण या रथोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. या रथोत्सवाला कार उत्सव म्हणूनही ओळखले जाते. देशातील सर्वाधिक प्रतीक्षेत असलेला हा हिंदू सण आहे. ज्यामध्ये असंख्य भक्तगण आणि असंख्य स्वयंसेवक रथाची सजावट करतात. रथाची आरास करतात.
संपूर्ण यात्रेचे मुख्य आकर्षण हे तीन रथ असतात, या रथांना दोरांनी ओढले जातात.
पहिला रथ भगवान जगन्नाथाचा असतो. या रथाची उंची ४५ फूट इतकी असून याला १६ चाके असतात. या रथाला “नंदीघोष” असे म्हणतात.
दुसरा रथ भगवान बलभद्राचा असतो. या रथाची उंची ४५ फूट इतकी असून याला १४ चाके असतात. या रथाला “तलध्वज” असे म्हणतात.
तिसरा रथ देवी सुभद्रेचा असतो. या रथाची उंची ४४.६ फूट इतकी असून याला १२ चाके असतात. हा रथाला “देवदलन” या नावाने ओळखले जाते.
रथयात्रा कधी सुरू झाली?
आपण जगन्नाथ रथयात्रा का साजरी करतो? रथयात्रा कुठे साजरी केली जाते?
पद्मपुराणानुसार भगवान जगन्नाथ म्हणजेच श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा ही त्यांची आणि बलरामाची लाडकी होती. एकदा सुभद्राने दोन्ही भावांकडे नगरला भ्रमण करण्याची इच्छा व्यक्त केली. ते बहिणीची इच्छा कशी टाळणार, म्हणून दोन्ही भावांनी बहिणीला शहरात फिरायला नेले. दरम्यान, ते त्यांची मावशी गुंडीचा यांच्या घरीही गेले आणि येथे त्यांनी ७ दिवस विश्रांती घेतली. तेव्हापासून भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेची परंपरा सुरू झाली. पुरी येथून भगवान जगन्नाथ, बलराम आणि देवी सुभद्रा यांची यात्रा निघते आणि ती गुंडीचा येथे पोहचते ७ दिवसांनी परत ती पुरी येथे येते. देवांचे पुन्हा विधिवत विराजमान केले जातात. पूजा विधी होते आणि आषाढ त्रयोदशीला यात्रेचा समापन होते.
रथ यात्रेची रूपरेषा :
बहिणीच्या इच्छेनुसार भगवान श्री जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि मोठा भाऊ बलराम वेगवेगळ्या रथांवर स्वार होऊन शहरात फिरत असताना मावशीच्या घरी म्हणजेच गुंडीचा मंदिराला भेट देतात.
सर्वात समोर बलरामाचा रथ, मध्यभागी बहीण सुभद्राचा रथ आणि मागील बाजूस श्री जगन्नाथाचा रथ असतो. मावशीच्या घरी घरी म्हणजेच गुंडीचा मंदिरात, देव सात दिवस विश्रांती घेतात. सात दिवसांनी ते परत पुरीला येतात. रथयात्रेचा हा संपूर्ण उत्सव १० दिवस चालतो. आणि १२ दिवसांनी समापन होते.
रथयात्रा रथयात्रेची रीत :
आषाढ द्वीतेयेला – यात्रेचा आरंभ होतो. याच दिवशी तिन्ही देवांचे रथ, गुंडीचा मावशीच्या घरी भेट देतात.
हेरा पंचमी: पुढील पाच दिवस भगवान गुंडीचा मंदिरात वास्तव्य करतात.
संध्या दर्शन: त्या नंतर श्री जगन्नाथाचे संध्या दर्शन घेतले जाते. या दिवशी दर्शन केल्याने १० वर्षे श्री हरीची पूजा केल्याचे पुण्य मिळते.
बहुदा यात्रा : भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांची गुंडीच्या वरून पुन्हा परतीचा प्रवास यात्रा सुरु होते.
दहाव्या दिवशी सर्व देव, जगन्नाथ मंदिरात परतल्यानंतर पुन्हा शाही रूप धारण करून, आपल्या जागी विराजमान होतात.
नीलाद्री बीजे : गलवार, द्वादशी ला, जगन्नाथ रथयात्रेतील सर्वात मनोरंजक विधींपैकी एक म्हणजे नीलाद्री बीज. या या नंतर खऱ्या अर्थाने रथ यात्रेची सांगता होते.
जगन्नाथ रथयात्रेचे महत्त्व
जगन्नाथ रथयात्रेत सहभागी होणे हे अत्यंत पुण्य कर्म मानले जाते. असे मानले जाते की १०० यज्ञांच्या कृतीने मिळणाऱ्या पुण्य इतके पुण्य, केवळ या यात्रेत सहभागी झाल्याने प्राप्त होते. जे लोक भगवान जगन्नाथ, बहीण सुभद्रा किंवा मोठा भाऊ बलराम यांचा रथ ओढतात, ज्यांना हे रथ दोरीला हात लावून ओढण्याची संधी मिळते, ते भाग्यवान आणि पुण्यवान मानले जातात. असे मानले जाते की परमेश्वराचा रथ ओढल्याने जाणूनबुजून किंवा नकळत घडलेली सर्व पापे नष्ट होतात. असा माणूस, जीवनातील सर्व सुखांचा उपभोग घेतो आणि शेवटी मोक्ष प्राप्त करतो. म्हणून येणाऱ्या प्रत्येक भाविकाची हीच ईच्छा असते, की एकदातरी रथ ओढण्याचे पुण्य मिळावे.
पुरीच्या श्री जगन्नाथ रथयात्रेबद्दल काही मनोरंजक तथ्ये:
१. भगवान श्री जगन्नाथ मंदिरात सर्व जाती, धर्म आणि समुदायाचे लोक जाऊन पूजा करू शकतात. त्यांच्यावर कोणतेही निर्बंध, कल्याही अटी नाहीत.
२. प्रत्येक वर्षी प्राथमिक पुजाऱ्याने आवश्यक असलेल्या सूचनांचे पालन करून झाडांच्या काही भागांचा वापर करून नवीन रथ तयार केला जातो. प्रत्येक रथाच्या पुढ्यात चार लाकडी घोडे असतात.
३. श्री जगन्नाथ यात्रेदरम्यानच्या रथाचा वरचा भाग मंदिराच्या आकारात बनवला जातो. रथाच्या छत्र्या १५०० मीटर कापडापासून बनवल्या जातात.
४. अक्षय्य तृतीयेच्या दिवसापासून रथ बनवण्याचे काम सुरू होते.
५. भक्तांच्या मते, रथयात्रा काढताना सुरुवातीला भगवान हलण्यास नकार देतात. प्रार्थनेच्या तासानंतर, रथ उत्तर देऊ लागतो. आणि त्यानंतर देव रथात बसविले जातात.
६. रथयात्रा सुरू होण्याच्या १ आठवडा आधी संपूर्ण मंदिराचे मुख्य द्वार बंद केले जाते.
७. असे मानले जाते की या काळात भगवंतांना खूप ताप येतो आणि त्यांना आठवडाभर विश्रांतीची आवश्यकता असते. ताप बरा झाला की देव मग प्रवासाला निघतात.
अशा प्रकारे जगन्नाथ यात्रा खूप श्रद्धेने आणि मनोभावाने साजरी केली जाते. हम्पीच्या रथाला युनेस्को जागतिक वारसा स्थान म्हणून ओळखले जाते. जगभरातील असंख्य पर्यटकांचे हे प्रमुख आकर्षण म्हणून संबोधले जाते.
आम्हाला आशा आहे की तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल. जर आपणास या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील सांगा. कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !
अधिक माहिती :
१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड
अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स
Jagannath rath yatra, jagannath puri rath yatra, happy wishes, puri jagannath temple rath yatra jagannath puri rath yatra,