Why Are Steering Wheels on the left side in America

Why Are Steering Wheels on the left side in America in Marathi: अमेरिकेत वाहनांची स्टीयरिंग व्हील्स डाव्या बाजूला का असते?

समजा तुम्ही आयुष्यभर भारतात ड्रायव्हिंग करत असाल आणि अचानक तुम्हाला अमेरिकेला (यूएसला) जावे लागले, तर तुम्हाला किमान काही दिवसांसाठी का होईना पण गैर सोय होईल, बरोबर. आम्ही नेमके कशाबद्दल बोलत आहोत याचा अजून अंदाज लावत असाल, कदाचित लागला ही असेल. बरोबर आहे आपण अमेरिकेलीत खूप सिनेमात पाहत आलो आहोत की, भारतीय वाहनांचे स्टीयरिंग कारच्या उजव्या बाजूला असते तर अमेरिकन वाहनांचे स्टीयरिंग डावीकडे असते. कधी विचार केला आहे, असे का असेल ते? प्रश्नाचे उत्तर पाहायला वेळ मिळालं नसेल, म्हणूच आज आम्ही, marathirang.com मध्य “माहिती” या सदराखाली ह्याच विषयीची माहिती देण्यासाठी हा लेख लिहत आहोत. चला तर वाचूया.

तुम्हाला हे वाचून कदाचित आश्चर्य वाटेल की जगातील बहुतांश देश अशी वाहने चालवतात, ज्यांचे स्टीयरिंग व्हील वाहनाच्या डावीकडे असते. भरता व्यतिरिक्त जपान, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया असे काही देश आहेत, ज्यांच्या वाहनांचे स्टीयरिंग व्हील उजवीकडे आहेत. बरं, भारताने ही प्रथा किंवा पद्धत पाळण्याचे कारण म्हणजे, वसाहती प्रभाव. अर्थातच इंग्रजांच्या वसाहतीचा प्रभाव.

भारत १५० वर्षांहून अधिक काळ ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली होता. भारतात सर्वप्रथम मोटारगाड्या ह्या ब्रिटीशांनीच आणल्या. औपनिवेशिक राजवटीमुळे आपण अंगीकारलेल्या इतर बर्‍याच ब्रिटीश पद्धती पैकी ही एक आहे. इंग्रजांनी भारतात आणलेली वाहनांची स्टीयरिंग व्हीलला उजव्या बाजूला होती, आणि आपणही ती तशीच स्वीकारली आहे. म्हणजे यावरून आपल्याला समजले आहे की, आपल्या देशातील वाहनांची स्टीयरिंग व्हील उजव्या बाजूला का आहे.

आता अमेरिकेत ही डाव्या बाजूला का आहे ते पाहून घेऊ. याचे खरे कारण शोधायचे झाल्यास, ऑटोमोबाईलच्या उत्पत्तिच्या आधीच्या दिवसांपासून शोधली जाऊ शकते. साधारण १८ व्या शतकातील अमेरिका जेव्हा टीमस्टर लोकप्रिय होते. टीमस्टर्स हे असे लोक होते जे घोड्यावर चालवलेल्या जाणाऱ्या वॅगन्स चालवतात. वॅगन्स म्हणजे चारचाकी माल वाहून नेण्याची उघडी गाडी, या गाडीत ते जागेच्या अभावामुळे स्वतः एखाद्या घोड्यांवरच बसायचे.

आता प्रश असा झाला की, बहुतेक लोक उजव्या हाताचे असल्याने, टीमस्टर्स त्यांच्या उजव्या हातात क्रॉप किंवा चाबूक घेऊन घोडागाडी हाकायचे. त्यामुळे त्यांना डाव्या हाताच्या घोड्यावर बसणे जास्त सोईचे वाटायचे आणि तेच आवश्यक होत असे. आता फक्त ट्रॅफिकची व्यवस्था करण्याचा प्रश्न राहिला होता. जेणेकरून ड्रायव्हर रस्त्याच्या उजव्या बाजूला असतील कारण बहुसंख्य टीमस्टर्स उजव्या हाताने चाबूक मारण्यात आणि डाव्या हाताच्या घोड्यावर स्वार होण्यात अधिक सोयीस्कर होते. रस्त्याची मध्य रेषा ही चालकाच्या जवळ असली पाहिजे, ज्यामुळे दोन्ही गाडीतील अंतर चालक चांगल्या प्रकारे मोजू शकतात. या सर्वांचा विचार करून त्यांनी दोन्ही गोष्टी अशा प्रकारे सुनियोजित केल्या. वाहनांची स्टीयरिंग डाव्या बाजूला आणि वाहन रस्त्याच्या उजव्या बाजूला ठेवले. आणि अशा प्रकारे अमेरिकेतील वाहनांची स्टीयरिंग उजव्या बाजूला स्थित झाली.

आम्हाला आशा आहे की तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल. जर आपणास या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील सांगा. कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !

Why Are Steering Wheels on the left side in America?

अधिक माहिती :

१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :

➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स

Tags: I hope you get the answers to all the questions below. Like why is the steering wheel on the left side? Why are steering wheels on the right in England? Why is the steering wheel on the right side of a car in Europe? The steering wheel on the left side countries? why is the steering wheel on the right side of a car? The steering wheel on the right side in America? why the steering wheel is on the right side in India? When did the steering wheels move to the left?

Marathi rang
संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x