Marathi Poem in Marathi – Ti Bhet | ती भेट मराठी कविता

Marathi Poem Ti Bhet | ती भेट मराठी कविता:

Marathi Prem Kavita Love | Love poem in Marathi: ती भेट प्रेम कविता (Ti Bhet Prem Kavita – By Marathi Rang) : नमस्कार मित्रांनो आज आपण marathirang च्या “कविता” ह्या सदराखाली आणखी एम प्रेम कविता देत आहोत. प्रियकर सोबत झालेली पहिली भेट आणि त्या आठवणी यांचे वर्णन या कवितेतून केलेलं आहे. वाचा तुम्हालाही आवडेल. धन्यवाद !

Marathi Kavita it vhet

|Related: Mazya Jeevanat Ghadavi Vari – Read more….

ती भेट

धुंद मनाच्या बेधुंद आठवणी
रंगीत फुलांची गंधित कहाणी
मधुर स्वरांची ती अधीर गाणी
ती भेट, वाऱ्यावरची विराणी

धडधड उरी अन काहूर मनी
अनामिक भीती कसली ध्यानी
लाजेचीही तीत मिश्र लाली
नकळत कशी मिसळून आली

गोड वीणा जणू झंकारे कानी
गंधाने आभा मंत्रमुग्ध झाली
क्षणात न कळता वाचा विरली
पापण्यांना सोबत अश्रूंची झाली

निस्वार्थ प्रेमाच्या अथांग सागरी
कटाक्षाच्या एकाच लाटेवरी
स्पर्शाने काया वाहून नेली
ती भेट, मिठीत समरसून गेली

अव्यक्त कथा अन व्यथा आता
छळतात जखमा येता जाता
ती भेट मात्र अजूनही देते
क्षणभर दिलासा चांदण्यांचा

—– प्रियांका रोठे

| Related: Poem on Maharashtra in Marathi | जय महाराष्ट्र देशा

अधिक कविता :

➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक माहिती :
१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स.

प्रियांका रोठे

About प्रियांका रोठे

नमस्कार, मी प्रियंका रोठे, महाराष्ट्र, ठाणे. मी यशस्वीरित्या माझ्यातील लेखनाचे प्रेम जपले आहे. पुस्तकांबद्दल माझे प्रेम बालपणातच विकसित झाले. मी शाळेच्या ग्रंथालयातून पुष्कळ पुस्तके वाचत होते. तेथून मला लेखनाची आवड आणि सवयही लागली. मला माझे विचार मातृभाषा, मराठीतुन लेखणीच्या साह्याने स्पष्ट करायला आवडतात. मला आशा आहे की तुम्हीही याचा आनंद घ्याल. धन्यवाद !

Check Also

A friendship Poem in Marathi

Maitri – A Friendship Poem in Marathi | मैत्री

Maitri – A friendship Poem in Marathi | मैत्री – Best Poem #1 Friendship Poem …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!