The Most Expensive Vegetable In The World | जगातील सर्वात महाग भाजी | No.1 Vegetable
The Most Expensive Vegetable In The World | जगातील सर्वात महाग भाजी:
नमस्कार मित्रांनो, आज आपण marathirang.com च्या “माहिती” या सदराखाली एका भाजीची माहिती वाचणार आहोत. काय आहे ही भाजी, किती आहे तिचे बाजार मूल्य आणि काय आहे तिची खासियत या सर्व प्रश्नाची उत्तरे या लेख द्वारे शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर करूया सुरुवात.
अशी कोणती भाजी आहे, ज्याची गणना जगातील सर्वात महाग भाजी मद्ये होते आणि काय खास आहे या भाजीत ज्यासाठी लोक त्या भाजीचे इतके पैसे देण्यास तयार होतात. (Most Expensive Vegetable)
Table of Contents :
सर्वसाधारण माहिती:
वस्तूची किंमत नेहमीच गुणवत्तेशी समानार्थी असे नाही. काही चवदार आणि स्वादिष्ट पदार्थ असतात जे आपल्याला खिशाला सहज परवडणारे असतात. तसेच काही विदेशी आणि महागड्या खाद्यपदार्थांचा विचार केला, तर ते इतके पौष्टिक ही नसतात. त्यामुळेच मला असे वाटते की नेहमीच वस्तूची किंमत, ही त्यावस्तूचा दर्जा ठरवू शकत नाही. आपण सहसा हिमालयात वाढणाऱ्या केशर आणि जंगली मशरूमच्या आवडीबद्दल विचार करतो, तेंव्हा त्या महाग असणे साहजिक वाटते. पण एक भाजी अशीही आहे जी किमतीच्या बाबतीत या सर्वांना झाकू शकते.
या भाजीचे नाव आहे “हॉपशूट्स”. ही भाजी युरोपियन देशांमध्ये अधिक लोकप्रिय आहे आणि जगातील सर्वात महाग भाजी म्हणून नावलौकिक आहे. औषधी गुणधर्मांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या भाजीची किंमत सुमारे रुपये ८५,००० प्रति किलो इतकी आहे. ही भाजी भारतात सहसा घेतली जात नाही. एका अहवालानुसार, असे वाचण्यात आले की पहिल्यांदाच हिमाचलमध्ये या भाजीची प्रथम लागवड करण्यात आली.
एका अहवालानुसार, असे आहे, की हॉप शूट्स “कापणी करण्यासाठी बॅक ब्रेकिंग” आवश्यक असतात आणि हेच ही भाजी महाग असण्याचे एकमेव कारण आहे. इतर भाजी किंवा वस्तूं प्रमाणे हॉप शूटची किंमत त्यांच्या गुणवत्तेनुसार बदलते. महाग असण्याबरोबरच ही भाजी बाजारात सहजासहजी मिळत नाही. जगातील सर्वात महाग भाजी – हॉप-शूट्स इतकी महाग आहे की त्याच किमतीत एखादी बाईक किंवा सोन्याचे दागिने विकत घेऊ शकतो. (Most Expensive Vegetable)
हॉप-शूट्स म्हणजे काय?
पाहूया नेमकी कोणती भाजी आहे ही. वैज्ञानिकदृष्ट्या “Humulus lupulus” म्हणून ओळखले जाते. ही एक बारमाही, स्वरूपाची वेल वनस्पती आहे. मूळ युरोप आणि उत्तर अमेरिकेत सापडली. जगातील सर्वात महाग भाजी सुरुवातीला एक तण असल्याचे मानले जात होते कारण ती भांग कुटुंबातील फुलांच्या वनस्पतीची एक प्रजाती असल्याचे वाटत होते. ते मध्यम दराने 6 मीटर (19 फूट 8 इंच) पर्यंत वाढते. एक वेल साधारणतः १५- २० वर्षांपर्यंत जगते. त्यामुळे एका वनस्पती पासून बऱ्याच वेळा ही भाजी मिळू शकते. (Most Expensive Vegetable)
हॉप-शूट इतके महाग असण्याचे कारण काय ?
गार्डियनच्या अहवालानुसार, हॉप शूट्स पूर्ण तयार होण्यासाठी तीन वर्षे लागतात. इतका वेळ या वनस्पतीची काळजी घ्यावी लागत. याची फळे कापणीसाठी खुप अंग मेहनतीची गरज लागते. झाडाच्या लहान हिरव्या टिपांना तोडताना वेलीची खूप काळजी घ्यावी लागते. आणि म्हणूनच ही वनस्पती जास्त महाग बनते. (Most Expensive Vegetable)
हॉप्सचे आरोग्यदायी फायदे
वैद्यकीय अभ्यासानुसार, असे सुचवले आहे की ही भाजी क्षयरोगाच्या विरूद्ध रोगप्रतिकार शक्ती तयार करते. चिंता, झोप न येणे (निद्रानाश), अस्वस्थता, तणाव, उत्तेजना, एकाग्रता, कमतरता-हायपर एक्टिव्हिटी डिसऑर्डर (एडीएचडी), चिंताग्रस्तपणा आणि चिडचिड अशा अनेक आजारांवर या भाजीचा उपयोग होतो.
हॉप कोन म्हणून ओळखल्या जाणार्या या महागड्या भाजीच्या फुलाचा वापर बिअर बनवताना स्थिरता कारक म्हणून केला जातो. अशी ही बहू गुणकारी भाजीची मागणी अधिक व उत्पादन कमी यामुळेच भाजीची किंमत गगनाला भिडली आहे. (Most Expensive Vegetable)
यासम इतर महागड्या भाज्या:
भारतात हॉपशूट्सची लागवड होत नसल्याने त्यांची किंमत इतकी जास्त आहे. पण आता याच्या लागवडीस सुरुवात झाली आहे, पूर्ण उत्पादनासाठी अजून ३ वर्ष जातील, त्या नंतर त्या भाजीची गुणवत्ता पाहून दर्जा आणि सातत्य ठरविले जाईल. पण उंच हिमालयात गुच्छी नावाची अशीच महागडी भाजी, तसेच हिमालयाच्या पायथ्याशी उगवल्या जाणाऱ्या जंगली मशरूमची किंमत ३०,००० रुपये किलो पर्यंत आहे.
मशरूम समशीतोष्ण प्रदेशातील शंकूच्या आकाराच्या जंगलात वाढतात आणि हिमालयाच्या थंड पायथ्याशी, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये, त्यांच्या वाढी साठी आदर्श प्रदेश व हवामान आहे.
त्याची उच्च किंमत आणि मागणी याचे एक कारण म्हणजे त्याची उपलब्धता. जस-जसे शेतीत प्रयोग केले जातील, तस-तसे उत्पादन वाढेल, आणि जसे उत्पादन वाढेल तसे या भाजीच्या किमतीवर नियंत्रण येईल. पण सध्या तर जगातील सर्वात महागडी भाजी म्हणून “हॉपशूट्स” दिमाखात मिरवत राहील. (Most Expensive Vegetable)
आम्हाला आशा आहे की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. जर आपणास या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील सांगा. कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. तुमचा बहुमूल्य वेळ, वाचनासाठी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !
अधिक माहिती:
१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड
अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स