Ashadhi Ekadashi – In Marathi | आषाढी एकादशी संपूर्ण माहिती

Ashadhi Ekadashi – In Marathi | आषाढी एकादशी संपूर्ण माहिती:

नमस्कार मित्रांनो आज आपण मराठीरंग (Marathirang.com) च्या भारतीय सण या सदराखाली पंढरपूर येथील आषाढी एकादशी पंढरपूर वारी या विषयीची माहिती घेणार आहोत. वारी म्हणजे काय? वारकरी कोणास म्हणतात. ही वारीची प्रथा कशी सुरु झाली? कधी पासून सुरु झाली? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपण या लेखात पाहणार आहोत. आषाढी एकादशीचे महत्व येणाऱ्या पिढीला समजावे म्हणून हा लेख लिहीत आहोत. (Ashadhi Ekadashi)

आषाढी एकादशी:

“आषाढी एकादशी” (Ashadhi Ekadashi) महाराष्ट्रातील एक उत्सव, हा एक उत्सव समाज ना. आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. तश्या प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात, शुक्ल पक्षातील आषाढ शुद्ध एकादशी आणि कृष्ण पक्षातील आषाढी वद्य एकादशी अशा दोन एकादशी या महिन्यात असतात. मराठी महिन्यातील चौथा महिना आषाढ. या महिन्यातील शुक्ल पक्षातील शुद्ध एकादशीला आषाढी एकादशी, महा एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मनाला जातो.

पंढरपूर वारी:

(Ashadhi Ekadashi) आषाढी एकादशीचे अवचित्त साधून महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून दिंडी घेऊन लोक पंढरपूरला येतात. असे म्हंटले जाते की इ.स. १६५० मध्ये हैबत बाबांनी आळंदीहून निघून पंढरपूला घेऊन जाणाऱ्या पालखीची प्रथा मांडली. आणि तेंव्हा पासून ही आज तागायत चालूच आहे.
महाराष्ट्रातील काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पायी दिंडीत सहभागी होतात. पायी चालत येणाऱ्या भक्तांना वारकरी म्हणतात आणि त्यांच्या दिंडीला आषाढी वारी. पंढरपूरला पोहचल्यावर, चंद्रभागेत स्नान करून, मनोभावाने आणि भक्ती-भावाने विठ्ठलाचे दर्शन घेतात.

Ashadhi Ekadashi – Marathi rang.

या आषाढी निमित्त, पंढरपुरास महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्रा बाहेरुन अनेक ठिकाणाहून दिंडी येतात. या उत्सवात सामील होणाऱ्या दिंडी पैकी, आळंदीहून ज्ञानेश्वरांची पालखी, देहूहून तुकाराम महारंज्यांची पालखी, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची पालखी, पैठणहून संत एकनाथांची पालखी, शेगाव येथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची पालखी, एदलाबाद येथून मुक्ताईची पालखी, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. तसेच इतर अनेक गावातून असंख्य पालख्या पंढरपूरला येतात. लाखो लोकांची येथे गर्दी असते. मोठा जनसमुदाय पंढरपूरला येऊन या उत्सवात सामील होतो.

या दिवशी विशेष करून वारकरी संप्रदायात उपवास केला जातो. उपवास करण्याचे विशेष महत्त्व असते. घर-घरातून लहाना-पासून तो वयोवृद्धांपर्यंत सर्वच जण उपवास करतात. दिवसभर उपवास केला जातो आणि रात्री भोजनात उपवासाचे विशेष पदार्थ सेवन केले जातात. यात राजगिरा, साबुदाणा, बटाटा, रताळे, वरई, शेंगदाणे यापासून तयार केलेले पदार्थच सेवन केले जातात. (Ashadhi Ekadashi – Pandharichi Vari)

विठोबाची कथा
(Ashadhi Ekadashi)
विठोबा हा देव भक्त पुंडलिकाच्या भेटीला आला होता. आणि तो संतांचा कैवारी झाला. त्याचा अवतार हा गयासूर नावाच्या राक्षसाचा समूळ नाश करण्यासाठी द्वापारयुगात झाला होता. त्याचा असंख्य जाचातून सर्व देवतांना सोडविण्यासाठी. श्रीहरीने बौद्धनामे अवतार घेऊन, गयासुरास अग्नित जाळून भस्म केलं. त्यानंतर भक्त पुंडलिकाला, त्याने केलेल्या माता-पित्याच्या सेवेचे फळ दिले. भगवान विठ्ठलाने एक विराट रूपाचे दर्शन देऊन पुंडलिकाला मोक्ष प्रदान केलं.

चातुर्मास:

“आषाढी एकादशी” हा दिवस भगवान विष्णूचे शयन दिवस म्हणून मानले जातात. याच दिवसा-पासून कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील कार्तिकी एकादशी पर्यंत भगवान विष्णू निद्राधीन राहतात. कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी असेही म्हणतात. या चार महिन्यांच्या काळाला “चातुर्मास” असे म्हणतात. चातुर्मासात विवाह सोबत बरेच शुभ काम टाळले जातात. या दिवसात तपस्वी लोकं सुद्धा भ्रमण न करता, एकाच ठिकाणी राहून तपस्या करतात. (Ashadhi Ekadashi – Chaturmas)
त्यामुळे असेही सांगतात की या चातुर्मासात केवळ व्रजची यात्रा केली जाते. असे प्रमाणित आहे की विश्वातील सर्व तीर्थ व्रजला येऊन निवास करतात. म्हणून या चातुर्मासात व्रजाला केलेल्या दर्शनामुळे सर्व तीर्थांचे दर्शन घेतल्याचे पुण्य मिळते.

एकादशीचे पौराणिक महत्व:

सत्युगात मांदता नावाचा एक चक्रवर्ती सम्राट राज्य करत होता. त्या राज्यातील प्रजा खूप सुखी आणि आनंदात राहत होती. एका वेळी राज्यात सलग तीन वर्ष पाऊस ना झाल्यामुळे, भयंकर आकाळ पडला होता. खूप बेताची परिस्थिती उद्भवली होती, लोकांच्या खाण्या-पिण्याचे मोठे संकट उभे राहिले होते. प्रजेच्या सुखासाठी काही उपाय शोधणे अनिवार्य होते. त्यामुळे राजा मांदता जंगलाच्या दिशेनं निघाला. विचार करत-करत जाता-जाता ते अंगिरा ऋषी च्या आश्रमात पोहचले. राज्याचे प्रश्न ऐकून ऋषींनी राजाला, देवशयनी एकादशीचे व्रत करायला सांगितले. हे व्रत केल्यास पावसाचे आगमन होइल आणि स्थिती पूर्ववत होण्याची हमी दिली. अंगिरा ऋषींनी सांगितल्या प्रमाणे राजाने, राज्यात परत येऊन विधिवत व्रत केले. या व्रात्यांच्या प्रभावाने, राज्यात चांगली वर्षा झाली. राज्य पुन्हा धन-धान्याने सुखी-संपन्न झाला. (Ashadhi Ekadashi-Pauranik mahatva)

अशीही मान्यता आहे की या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने, भगवान प्रसन्न होऊन आपल्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात.

१३वे ते १७वे शतक या दरम्यान महाराष्ट्रात अनेक संतांनी विठ्ठलाचे गुणगान त्यांच्या अभंगात, कीर्तनात गायले. त्यांची मनोभावे भक्ती केली. मग ते संत नामदेव, तुकोबा, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ या सर्वानी विठ्ठलाच्या भक्तीचे खूप छान वर्णन केले आहे. त्यांच्या पासूनच हा पारंपरिक वारकरी संप्रदायाचा वारसा चालू झाला, तो आजतागायत वाढतच आहे आणि वाढत राहणार आहे.
असा हा शेकडो वर्षाच्या परंपरेचा वारसा, पंढरपूर येथील गर्दी पाहिल्यावर येतो. चहुबाजूने अफाट पसरलेला भक्तीचा सागर. विरुद्ध दिशेने चालेलल्या माणसालाही वळून पाहावयास लावतो. नकळत त्याचे हात जुळून छातीवर येतात आणि मन भक्तिमय होऊन कधी मंदिराच्या दिशेनं झुकतं हे त्याचे त्यालाच कळत नाही.

आषाढी एकादशीचे माहात्म्य :

कुंभ दैत्याचा मुलगा मृदूमान्य, याने भगवान शंकराची खडतर पूजा करून, त्यांना प्रसन्न केले. त्याचे फळस्वरूप त्याने अमरत्व मागितले. मात्र शंकराने हे वरदान देताना त्यांनी, तुझा मृत्यू एका स्त्रीच्या हाती होईल असा वरदान दिला. हे वरदान मिळाल्याने आता त्याला कोणत्याही देवतांकडून कोणतेच भय राहिले नव्हते. सर्व देव भयभीत झाले, त्यांनी भगवान शंकराकडे मदत मागितली. पण भोलेनाथ यांनीच वरदान दिल्याने, ते कोणतीही मदत करण्यास असमर्थ होते. अखेर सर्व देव चित्रकूट पर्वतावरील धातरी वृक्षाच्या तळी, एका गुहेत लपून बसले. या दिवशी आषाढी एकादशी ची तिथी होती. गुहेत असल्यामुळे ते सर्व देव काहीच खाऊ शकले नाहीत. अप्रत्येक्ष पणे त्यांच्या कडून उपवास घडला. पावसाचे दिवस आल्यामुळे तेथेच त्यांचे स्नानही घडले. अशा शुभ मुहूर्तावर सर्व देवतांच्या एकत्रित श्वासांपासून एक शक्ती प्रकट झाली. आणि या शक्तीने, मृदूमान्य राक्षसाला मारून सर्व देवतांची मुक्तता केली. ही जी शक्ती देवी म्हणजेच एकादशी देवी. म्हणूनच एकादशी देवतेत सर्व देवतांचे तेज एकवटलेलं असतं असे म्हटले जाते. (Ashadhi Ekadashi – Mahatmya)

आधुनिक युग :

आधुनिक युगात अनेक लोक, सणाच्या निमित्त शुभेच्छा संदेश पाठवतात. महाराष्ट्रातील शाळा, कॉलेज मुलांना पारंपरिक वेश परिधान करून दिंडीत नाचतात. अभंग, भजन, कीर्तन गातात. मूली तुळशी वृदावन घेऊन कीर्तनात तल्लीन होतात. मुले मृदूंग, टाळ यांचा गजर करत, पायाचा ठेका धरून हरिनाम घेण्यात दंग होतात. पंढरपूरला जाण्यास न मिळाल्याने येथेच या सोहळ्याचा आनंद घेतात. विठ्ठल मंदिरात मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात, दिंडी सोहळ्याचे आयोजन करतात.

marathirang.com

हे दृश्य पाहिल्यावर मन प्रसन्न होतं. आपल्या राज्याचा सांस्कृतिक वारसा अबाधीत असल्याची खात्री पटते. आपणच हे संस्कार येणाऱ्या नवीन पिढीला दिले पाहिजेत. त्यांना याचे महत्व सांगितले पाहिजे. (Ashadhi Ekadashi – Modern world)

जग सत्याची कास धरो,
जन मदतीचा ध्यास उरो,
मन विठ्ठल विठ्ठल स्मरो.
मन विठ्ठल विठ्ठल स्मरो……

पांडुरंग आपल्याला या कार्यात मदत करो.

आम्हाला आशा आहे की तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल. जर आपणास या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील सांगा. कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ! (Ashadhi Ekadashi – all about)

अधिक माहिती :

१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :

➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x