Spiritual Quotes About Life In Marathi | अध्यात्मिक सुविचार

Spiritual Quotes In Marathi | मराठी अध्यात्मिक सुविचार :

नमस्कार मित्रांनो, आज आपण marathirang.com च्या “सुविचार” या सदराखाली “अध्यात्मिक विचार” या विषयावरचे विचार पाहणार आहोत. सुविचार सद्गुरू श्री. वामनराव पै यांचे. Spiritual quotes by Sadguru Shri. Vamanrao Pai,

spiritual quotes about life in marathi
marathirang.com

चातुर्मासांत लोक नानाप्रकारची व्रते करतात,
परंतु ‘मी कोणाचेही मन दुखविणार नाही’ असा
निश्चय करून ते आचरणांत
आणण्याचा प्रयत्न करणे, हे सर्वश्रेष्ठ व्रत होय.

-– सद्गुरू श्री. वामनराव पै

spiritual quotes about life in marathi

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’’ हे खरे नाही.
जीवनातील 90 टक्के घटना या स्वाधीन
असून फक्त 10 टक्के घटना
पराधीन असतात.
-– सद्गुरू श्री. वामनराव पै

spiritual quotes about life in marathi
marathirang.com

परमेश्वर विश्वरुपाने समोर आहे,
शरीर रुपाने जवळ आहे व
सच्चिदानंद स्वरुपाने तो हृदयात आहे.

-– सद्गुरू श्री. वामनराव पै

spiritual quotes about life in marathi
marathirang.com

जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून
कोणीही वरिष्ठ नाही व कोणीही कनिष्ठ नाही,
आहेत ते सर्व श्रेष्ठ
कारण सर्वच असतात आपापल्यापरी उपयुक्त.

-– सद्गुरू श्री. वामनराव पै

spiritual quotes about life in marathi

सत्कर्म हाच खरा धर्म व
सत्कर्मांचे आचरण करणे हेच आहे धर्माचरण.
श्रध्दा पाहिजे सत्कर्मावर आणि
सबुरी पाहीजे सत्कर्माचे फळ मिळण्यासाठी.
-– सद्गुरू श्री. वामनराव पै

spiritual quotes about life in marathi

देवासकट सर्व काही प्राप्त करुन
देण्याचे सामर्थ्य प्रयत्नात आहे,
म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ होय.
-– सद्गुरू श्री. वामनराव पै

spiritual quotes about life in marathi
marathirang.com

राष्ट्राच्या अपेक्षेत जीवनविद्या
फक्त दोनच जाती मानते त्या म्हणजे
राष्ट्रभक्त व राष्ट्रद्रोही आणि
विश्वाच्या अपेक्षेत जीवनविद्येला
सज्जन व दुर्जन अशा दोनच जाती मान्य आहेत.
-– सद्गुरू श्री. वामनराव पै

spiritual quotes about life in marathi
marathirang.com

दिव्य जाणीव, दिव्य प्रतिभाज्ञान व दिव्य आनंद
यांनी युक्त अशी सर्वव्यापी, सर्वसमर्थ,
अनंतस्वरुप दिव्य शक्ती म्हणजे
निर्गुण निराकार परमेश्वर.
-–  सद्गुरू श्री. वामनराव पै

spiritual quotes about life in marathi
marathirang.com

निसर्ग नियमांसहित, स्वयंचलित,
स्वयंनियंत्रित, नैसर्गिक, पद्धतशीर,
व्यवस्था म्हणजे सगुण साकार परमेश्वर.
-– सद्गुरू श्री. वामनराव पै

spiritual quotes about life in marathi
marathirang.com

सुंदर विचारांची जोपासना
हीच आहे परमेश्वराची उपासना
हे सत्य नित्य स्मरणात ठेवून
जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे.
-– सद्गुरू श्री. वामनराव पै

spiritual quotes about life in marathi
marathirang.com

वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला
सुरेख आकार देण्याच्या प्रयत्नांत
यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे.
-– सद्गुरू श्री. वामनराव पै

spiritual quotes about life in marathi
marathirang.com

सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या
झाल्याच पाहिजेत हा आग्रहच
माणसांच्या सर्व दु:खांना कारणीभूत ठरतो.
-– सद् गुरू श्री. वामनराव पै

अधिक कविता :

➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक माहिती :
१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स.

I hope you will find here all types of quotes like spiritual quotes in Marathi, Holi spiritual quotes in Marathi, Marathi quotes on life, attitude, Shabd,
happy quotes in Marathi, for Instagram, on love, friendship, and many more. Quotes of Shri Vamanrao Pai, Marathi quotes of Shree Vamanrao Pai.

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x