Meaning Of Cross X Symbol Behind The Train

Meaning Of Cross X Symbol Behind train|ट्रेनच्या मागे पिवळा क्रॉस का?

नमस्कार मित्रांनो आज आपण मराठीरंग (Marathirang.com) च्या माहिती या सदराखाली रेल्वे विषयीची एक खास माहिती करून घेणार आहोत.
तुम्ही भारतीय रेल्वेच्या ट्रेनमधून अनेकदा प्रवास केला असेल, पण कधी तुम्ही ट्रेनच्या मागे “X” लिहिले पहिले आहे का? नक्कीच पहिले असेल.
तुमच्या लक्षात आले असेल की ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर ‘X’ चिन्ह काढलेले असते. पण तुम्हाला माहित आहे का या ‘X’ चिन्ह चा अर्थ काय? आणि हे का लिहिलेले असते. आजच्या या लेखात आपण हेच पाहणार आहोत. चला तर वाचू या !

लहानापासून आपण आतापर्यंत सर्वांनीच रेल्वे प्रवास केलेलाच असेल. भारतात रेल्वे जाळे विस्तीर्ण प्रदेशात विस्तारलेल्या, अनेक शहरे, राज्ये, भौगोलिक प्रदेश यांना रेल्वेने जोडली आहे. या रेल्वेच्या बाबतीत अनेक गमतीशीर गोष्टी आहेत, त्या पैकी एक आज आपण माहित करून घेऊ.

भारतीय रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर मागच्या बाजूला ‘X’ का लिहितात? ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर लिहिलेले ‘X’ चिन्ह असे सूचित करतो की हा डबा ट्रेनचा शेवटचा डबा आहे. ट्रेन या शेवटच्या डब्यासह पुढे जात आहे आणि या मागे एकही डबा शिल्लक नाही. हे चिन्ह साधारणपणे पिवळ्या आणि पांढर्‍या रंगात लिहिलेले असतो. चिन्ह लिहून असा संदेश दिला जातो की ट्रेनच्या मागे कोणतेही डबे शिल्लक राहिलेले नसून, पूर्ण ट्रेन सुखरूपपणे पुढचा प्रवास करत आहे.

या चिन्हाचे महत्त्व काय ?

ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर अशी खूण असण्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर “X” मार्क हा अपघात वाचवण्याच्या उद्देशाने, अधिक ठळकपणे लिहिलेला असतो. अशी खूण पाहून तो त्या ट्रेनचा शेवटचा डबा आहे हे निश्चित करण्यात मदत होते.

हे चिन्ह रेल्वे कर्मचार्‍यांना हे सूचित करण्यास मदत करते. जर “X” चिन्हाचा डबा ट्रेनच्या मागे नसला तर ती स्थिती जोखमीची आहे असे समजले जाते. डबा ट्रेनपासून वेगळा झाल्यास अपघात होण्याची शक्यता असते किंवा त्या डब्यासह इतर डबे मागे राहण्याची शक्यता जास्त असते.

रेल्वे क्रॉसिंगवर हिरवा झेंडा दाखवण्यासाठी कार्यरत असलेला गार्ड “X” चिन्ह पाहतो जेणेकरून त्या ट्रेनचे सर्व डबे जोडलेले आहेत याची खात्री करून, तास बातमी पुढच्या स्टेशन कडे पोहचवतो.

‘X’ चिन्ह नसल्यास काय होईल ?

जर एखादी ट्रेन एखाद्या स्टेशनवरून जात असेल आणि शेवटच्या डब्यावर ‘X’ ची खूण नसेल, तर स्टेशन मास्टर असा अंदाज करतात की ट्रेन अडचणीत आहे. जोपर्यटन ट्रेनचा शेवटचा डब्याशिवाय पुढे जाऊ दिली जात नाही. ट्रेन त्याच स्टेशनवर थांबविली जाते.

त्यानंतर स्टेशन मास्टर अपघात टाळण्यासाठी अलर्ट काढतो. जर एखाद्या माणसाला ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर ‘X’ चिन्ह नसलेली ट्रेन दिसली, तर त्याने, असे समजून घेतले पाहिजे की ट्रेनचे काही डब्बे मागे राहिले असावेत, आणि लगेचच जवळच्या रेल्वे स्टेशनला अलर्ट करावे.

स्टेशन ओलांडून ‘X’ चिन्ह असलेला शेवटचा डबा पाहिल्यानंतरच स्टेशन मास्टर आधीच्या स्टेशनच्या स्टेशन मास्टरला दुसरी ट्रेन सोडण्याची परवानगी देतो.

‘LV’ चिन्हाचा अर्थ काय ?

जर तुम्ही बारकाईने पाहिले तर ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर तुम्हाला क्रॉस ‘X’ चिन्हासह, ‘LV’ ही अक्षरे देखील आढळतील. LV हा शब्द शेवटचे वाहन दाखवतो (Last Vehicle = LV) . हे पिवळ्या रंगावर काळ्या रंगाने हायलाइट केलेला किंवा लाल रंगावर पांढऱ्या रंगाने हायलाइट केलेला एक लहान फलक असतो. हे चिन्ह देखील सामान्यतः वाहनाच्या मागील बाजूस जोडलेले असते. अक्षर ‘X’ च्या खाली एक लाल दिवा बसविलेला असतो आणि तो निदर्शनास अणण्यासाठी एक महत्वाचा घटक आहे.

अधिक माहिती :

१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :

➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स

Tags: I hope you got the answer to all the questions like What does the X mean at the train stop? What does the symbol marked X indicate? What does the symbol of a train mean? Why there is a yellow cross on the train? why ‘x’ is written on the back of the train? symbol of ‘X’ on the train, in train coach, means train back side x symbol, why x is written on the back of the train in Hindi, what is x in train? train back side x meaning in Marathi,

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x